गुंजेगावात "सर्वपक्षीय परिवर्तन'चा सत्ताधाऱ्यांना झटका ! "या' दाव्याने समर्थक "आप'चा जिल्ह्याच्या राजकारणात प्रवेश 

श्‍याम जोशी 
Thursday, 21 January 2021

येथील ग्रामपंचायतच्या नऊ सदस्य निवडीसाठी मतदान झाले. गेल्या 15 वर्षांपासून गुंजेगाव येथे सत्ताधारी पक्षाने असमाधानकारक कार्य केल्यामुळे गावातील सर्व ग्रामस्थांनी ही सत्ता उधळून लावण्याचे ठरवले आणि त्या जागी सर्वपक्षीय परिवर्तन पॅनेलला सत्ता द्यायचे निश्‍चित केले. तीन प्रभागांतून आम आदमी पार्टीने पाठिंबा देत सर्वपक्षीय परिवर्तन पॅनेलद्वारे सहभाग घेतला. 

दक्षिण सोलापूर : गुंजेगाव (ता. दक्षिण सोलापूर) येथील आम आदमी पार्टीचे (आप) समर्थन असलेल्या सर्वपक्षीय परिवर्तन पॅनेलने सर्व नऊ जागांवर विजय मिळवल्याने गुंजेगाव ग्रामपंचायतीवर "आप'चा झेंडा फडकल्याचा दावा आपने केला आहे. या दाव्यामुळे आम आदमी पार्टीचा जिल्ह्याच्या राजकारणात प्रवेश झाला आहे. 

येथील ग्रामपंचायतच्या नऊ सदस्य निवडीसाठी मतदान झाले. गेल्या 15 वर्षांपासून गुंजेगाव येथे सत्ताधारी पक्षाने असमाधानकारक कार्य केल्यामुळे गावातील सर्व ग्रामस्थांनी ही सत्ता उधळून लावण्याचे ठरवले आणि त्या जागी सर्वपक्षीय परिवर्तन पॅनेलला सत्ता द्यायचे निश्‍चित केले. तीन प्रभागांतून आम आदमी पार्टीने पाठिंबा देत सर्वपक्षीय परिवर्तन पॅनेलद्वारे सहभाग घेतला. पक्षाच्या कार्यकर्त्यांनी केलेल्या प्रचारामुळे नऊ उमेदवार निवडून आल्याचा दावा पक्षाने केला. या विजयी उमेदवारांचा आम आदमी पार्टीच्या वतीने सत्कार करण्यात आला. या वेळी जिल्हा कार्याध्यक्ष ऍड. खतीब वकील, जिल्हा उपाध्यक्ष प्राजक्त चांदणे, अस्लम शेख, अतिश गायकवाड, बाबा सगरी, जैनू शेख, रहीम शेख, रॉबर्ट गौडर, समी सातखेड, असिफ शेख, निहाल किरनळ्ळी, भारत अली, उन्मेज नर्सरी, एत्तेकात वहाब आदी उपस्थित होते. 

येथील दिवंगत सुरेश पाटील यांनी त्यांच्या हयातीत गुंजेगावातील राजकारणात परिवर्तन होऊन चांगल्या कामाला गती मिळायला हवी, यासाठी घडी बसवण्याचा प्रयत्न केला. तेच सूत्र धरून त्यांचे चिरंजीव आम आदमी पार्टीचे पश्‍चिम महाराष्ट्र संघटन मंत्री सागर पाटील यांनी गावात काम करून ही निवडणूक जिंकून देण्यास परिश्रम घेतले. या विजयामध्ये बाळू पाटील व सागर पाटील यांची भूमिका खूप महत्त्वाची ठरली. 

विजयी उमेदवार असे... 

  • प्रभाग एक ः संतोष मोटे, मीरा साळुंके, सफलता पाटील 
  • प्रभाग दोन ः शंकर पवार, पार्वती जाधव, अंजना जाधव 
  • प्रभाग तीन ः किरण आठवले, वर्षा बडकुंबे, तुकाराम भडकुंबे 

आम आदमी पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष अरविंद केजरीवाल यांचे देशाच्या विकासाचे स्वप्न आता सोलापूरच्या गुंजेगावातून साकार होताना आपल्याला दिसणार आहे. 
- सागर पाटील, 
पश्‍चिम महाराष्ट्र संघटन मंत्री 

संपादन : श्रीनिवास दुध्याल


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The all party panel defeated the ruling party in Gunjegaon Gram Panchayat