सोलापूर ग्रामीणचे आजचे सगळे अहवाल निगेटिव्ह

सोलापूर ग्रामीणचे आजचे सगळे अहवाल निगेटिव्ह
Updated on

सोलापूर ः जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील सात जणांचे अहवाल आज प्राप्त झाले आहेत. ते सातही अहवाल निगेटिव्ह आल्याने जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील जनतेला दिलासा मिळाला आहे. 


ग्रामीण भागामध्ये आजपयर्ंत ४३ जणांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यामध्ये २६ पुरुष व १७ स्त्रियांचा समावेश आहे. आतापयर्ंत पाच जणांचे जीव कोरोनामुळे गेले आहेत. त्यामध्ये तीन पुरुष व दोन स्त्रियांचा समावेश आहे. कोरोना बाधित असलेले ३२ जण अद्यापही रुग्णालयात उपचार घेत आहेत. त्यामध्ये १८ पुरुष व १४ स्त्रियांचा समावेश आहे. आतापयर्ंत पाच जण रुग्णालयातून बरे होऊन घरी गेले आहेत. त्याबाबतचा अहवाल जिल्हा आरोग्य अधिकारी डाॅ. भीमाशंकर जमादार यांनी नुकताच जाहीर केला आहे. ग्रामीण भागातील एक हजार ३२७ जणांची तपासणी करण्यात आली. त्यापैकी एक हजार २९७ जणांचे अहवाल प्राप्त झाले आहेत. अद्यापही ३० अहवाल प्रलंबित आहेत. एक हजार २५५ जणांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. तर आतापयर्ंत ४२ जण कोरोनाबाधित झाले आहेत. 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Solapur DCC Bank Loan : ओंकार साखर कारखाना ग्रुपला दिलेल्या कर्जाची चौकशी करावी  अॅड. दिपक पवार यांची जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेच्या सर्वसाधारण सभेत मागणी
Mohol Taluka Appoints Administrators For 73 Gram Panchayats As Eight Officers Shoulder Charge Of Multiple Villages
Amol Shinde Comments On Deshmukh Camp And BJP Rivals As Chandrakant Patil Says Der Hai Andher Nahi
Pandharpur Crime 55 Year Old Woman Held for Allegedly Killing 70 Year Old Lover DNA Report Reveals Victim Identity
Marathi News Esakal
www.esakal.com