तुमचा वाहन परवाना हरवलाय का? ! डूप्लिकेट परवाना, परवाना नुतनीकरण अन्‌ पत्ता बदलण्याची कामे करा घरी बसूनच

4Driving_Licence_home_delivery.jpg
4Driving_Licence_home_delivery.jpg

सोलापूर : वाहनधारकांना वाहन परवान्यावरील पत्ता बदलणे, परवाना नुतनीकरण अथवा हरवलेला परवाना नव्याने काढण्याची सोय आता परिवहन आयुक्‍तालयाने घरबसल्या उपलब्ध करुन दिली आहे. त्यासाठी अर्जावरील डिजिटल स्वाक्षरीसाठी आरटीओ कार्यालयाचे उंबरठे झिजवण्याची गरज नाही. आधार नंबरच्या माध्यमातून ऑनलाइन पेमेंट करुन ही सर्व प्रक्रिया स्वत:च्या मोबाईलवरुन अथवा गावातील आपले सरकार सेवा केंद्रांवरुन करता येणार आहेत. ​पत्ता बदलासाठी बदललेल्या जागेचा पुरावा तर परवाना नुतनीकरणासाठी वाहनचालकाचे मेडिकल प्रमाणपत्र (एमबीबीएस डॉक्‍टरांचे) अपलोड करणे आवश्‍यक असणार आहे.

प्रत्यक्ष कार्यालयात येण्याची गरज नाही
मूळ परवाना (लायसन्स) हरविल्यानंतर डुप्लिकेट वाहन परवाना काढणे, परवाना नुतनीकरण अथवा वाहन परवान्यावरील पत्ता बदलण्यासाठी आता कार्यालयात येण्याची गरज नाही. ई-साईन या नव्या प्रणालीद्वारे अर्जदाराला घरी बसून अर्ज करता येईल.  ​पत्ता बदलासाठी बदललेल्या जागेचा पुरावा तर परवाना नुतनीकरणासाठी वाहनचालकाचे मेडिकल प्रमाणपत्र (एमबीबीएस डॉक्‍टरांचे) अपलोड करणे आवश्‍यक असणार आहे.
- संजय डोळे, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी, सोलापूर

राष्ट्रीय सूचना केंद्र यांनी महाराष्ट्र राज्यासाठी आधार क्रमांकावर 'ई-साईन' प्रणाली 'सीडीएसी'च्या सहायाने विकसीत केली आहे. परिवहनच्या संकेतस्थळाला त्याची जोड देण्यात आली असून त्याची अंमलबजावणीदेखील सुरु झाली आहे. अर्जदाराने स्वत:चा आधार क्रमांक नोंदविल्यानंतर त्यांनी अपलोड केलेली सर्व कागदपत्रे ई-साईन होऊन या प्रणालीच्या माध्यमातून संबंधित विभागातील कार्यालयाकडे जातील. त्यामुळे अर्जदाराला पुन्हा आरटीओ तथा उपप्रादेशिक कार्यालयात हेलपाटे मारायची गरज भासणार नाही, असा विश्‍वास परिवहन आयुक्‍त डॉ. अविनाश ढाकणे यांनी व्यक्‍त केला आहे. तर सर्वप्रथम सारथी विषयक सेवांसाठी ई-साईन (डिजिटल स्वाक्षरी) ही प्रणाली सुरु करण्यात आली होती. आता परिवहन विभागासंबंधीच्या कामांसाठीही या प्रणालीचा वापर केला जात आहे. 

अर्जदारांसाठी 'अशी' आहे कार्यप्रणाली

  • परिवहन कार्यालयाच्या संकेतस्थळावर गेल्यानंतर कामासंबंधीचा पर्याय निवडावा
  • ऑनलाइन अर्ज केल्यानंतर कागदपत्रे अपलोड करण्यापूर्वी ई-साईन पर्याय निवडणे आवश्‍यक
  • ई-साईन पर्याय निवडल्यानंतर कागदपत्रे अपलोडिंग करावे; अर्जदाराला अर्ज व त्यासोबतची कागदपत्रे आधार क्रमांकाचा वापर करून ओटीपीद्वारे ई-साईन करता येतील
  • शेवटी अर्जदाराने ऑनलाइन पेमेंट करावे; जेणेकरून अपॉइमेंटची कार्यवाही पुढे होईल
  • ई-साईनचा वापर करुन दाखल अर्जासाठी अर्जदाराला कार्यालयात जाण्याची गरज नसेल
  • अपॉइमेंट मिळाल्यानंतर त्या दिवशी संबंधित अर्जदारास कार्यालयातून अंतिम प्रक्रिया करुन घेता येईल
  • ​पत्ता बदलासाठी बदललेल्या जागेचा पुरावा तर परवाना नुतनीकरणासाठी वाहनचालकाचे मेडिकल प्रमाणपत्र (एमबीबीएस डॉक्‍टरांचे) अपलोड करणे आवश्‍यक असणार आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com