अपघातग्रस्त युवकाच्या मदतीसाठी एकवटले देगाव : याला माणुसकी ऐसे नाव  ऐन निवडणुकीच्या धामधुमितही पक्षीय राजकारण बाजूला ठेवून गोळा होतेय लाखोंची मदत 

अपघातग्रस्त युवकाच्या मदतीसाठी एकवटले देगाव : याला माणुसकी ऐसे नाव  ऐन निवडणुकीच्या धामधुमितही पक्षीय राजकारण बाजूला ठेवून गोळा होतेय लाखोंची मदत 

Published on

वाळूज, (ता.मोहोळ जि. सोलापूर) : देगाव (वा.) ता.मोहोळ येथील अपघातग्रस्त युवकाच्या मदतीसाठी सारा गाव एकवटला असून, माणुसकीच्या नात्याने मदत करण्याचे आवाहन ग्रामस्थांनी केले आहे. ऐन निवडणुकीच्या धामधुमीतही पक्षीय राजकारण बाजूला ठेवून त्याच्या दवाखान्याच्या शस्त्रक्रियेसाठी लागणारी लाखोंची आर्थिक मदत गोळा होत आहे. फेसबूक, व्हॉट्‌सऍप ग्रुपसारख्या सोशल मीडिया वरील मदतीच्या आवाहनाला जिल्ह्यासह राज्यातून प्रतिसाद मिळत आहे. 

मेंदूच्या शस्त्रक्रियेसाठी अंदाजे सहा लाख रुपये खर्च डॉक्‍टरांनी सांगितला आहे. आता पर्यत एक लाख चाळीस हजार रुपये जमा झाले आहेत. 22 डिसेंबर रोजी शेतातील कामे करून तो बाजारातून बैल आणण्यासाठी मोडनिंब (ता.माढा) येथे गेला होता. परत येत असताना सोलापूर-पुणे महामार्गावरील खंडाळीपाटी येथे अज्ञात दुचाकीस्वाराने चुकीच्या दिशेने येवून त्याच्या दुचाकीला समोरासमोर जोरदार धडक दिली. 

देगाव (वा.) येथील अपघातग्रस्त युवक तात्यासाहेब दादा कांबळे (वय -22 वर्ष) असं त्याचं नाव आहे.तो चौथी पाचवीत असतानाच शेतात गुरे चारायला गेलेल्या त्याच्या वडीलांच्या अंगावर वीज कोसळून त्यांचा मृत्यू झाला आणि त्याच्यासह कुटुंब पोरके झाले. त्याला जमीन नाही. वडीलांचे छत्र हरपल्याने कुटुंबाची जबाबदारी आई आणि त्याच्यावर पडली. तेव्हा पासून काबाडकष्ट करून आई आणि तो कुटुंब सांभाळतात. बहिणीचं लग्न केलं. शेतातली पडेल ती काम करत होता. अचानक त्याचा अपघात झाला. तो सध्या दवाखान्यात जीवन मरणाशी झुंज देत आहे. 

सोलापूर येथे खासगी दवाखान्यात उपचार सुरू आहेत. डॉक्‍टरांनी मेंदूवरील शस्त्रक्रीयेसाठी साडे तीन लाखांच्या आसपास खर्च सांगितला आहे दवाखान्याचा इतर खर्च वगणा गावातील सामाजिक कार्यात नेहमीच सहभागी असलेल्या तरुणांनी मदतफेरी काढून एक लाख चाळीस हजार रुपये जमा केले आहेत. अजूनही चार लाख साठ हजार रुपये देणगीदारांकडून जमा करावे लागणार आहेत. तो प्रचंड अडचणीत व असहाय आहे. आपापल्या परीने जमेल ती आर्थिक मदत लोक करीत आहेत. सर्वांनी केलेल्या मदतीची पै न पै मोलाची आहे. सध्या डॉक्‍टरांचं म्हणणं आहे की, "आतापर्यंत जेवढा खर्च झाला आहे ती रक्कम अगोदर भरा. "अपघातग्रस्त व्यक्तीचं कुटुंब हतबल आहे. पैसे मिळण्याचे स्रोत संपलेत. सध्या वैयक्तिकरित्या व्याजानं पैसे काढणे सुरु आहे. प्रशासकीय व शासकीय मदत संदर्भात आपण आश्वासक आहोत. पण ती प्रक्रिया खूप कीचकट व वेळखाऊ आहे. माणुसकीच्या नात्यातून त्या अनाथ मुलाची मदत आपण करु शकत असू तर ही निश्‍चितच खूप मोठी गोष्ट आहे. ज्यांना तळमळ वाटते त्यांनी या मुलासाठी आर्थिक योगदान द्यावे. आज ना उद्या तूम्हा सर्वांच्या या संवेदनशील मदतीची नोंद माणुसकीच्या इतिहासात नक्कीच राहील. 
त्याच्या लहान भावाच्या बॅंक खात्याचा तपशील सोबत दिला आहे. समाजातील दानशूर व्यक्ती, सेवाभावी संस्था यांनी सहकार्य करावे, अशी कळकळीची विनंती ग्रामस्थांनी केली आहे. 
Samadhan Dada Kamble 
A/C no.071918110000285 
Bank of India Mohol 
IFSC Code-BKID0000719 
Phone pe/Google No.88059 74285 (Bapu Kamble)
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com