आम्हीपण हरलो, आता अत्याचाराला हैदराबाद....

अशोक मुरूमकर
सोमवार, 10 फेब्रुवारी 2020

प्रफुल दामोदर यांनी याबाबत म्हटले की, ‘हिंगणघाट व सिल्लोड दोन्ही प्रकरणातील मुलींना तात्काळ  न्याय मिळावा..! भरचौकात फाशी द्या! कायद्याचे राज्य आहे हे दाखवून द्या... बाकी आरोपींची जात पाहून उसळणारे महाभाग कलंक आहेत महाराष्ट्रावर!’

सोलापर : हिंगणघाट जळीत प्रकरणातील पीडितेचा मृत्यू झाल्याची घटना वाऱ्यासारखी सर्वत्र पसरली. त्यानंतर सर्व स्तरातून हळहळ व्यक्त केली जाऊ लागली आहे. ‘आम्हीपण हरलो’ अशा शब्दात सोशल मीडियावर भावना व्यक्त केल्या जात असून या प्रकरणात सरकारलाही नेटीजन्सनी धारेवर धरले आहे. 

हिंगणघाटमधील पीडिता प्राध्यापिका हरली जीवनाची परीक्षा
प्रफुल दामोदर यांनी याबाबत म्हटले की, ‘हिंगणघाट व सिल्लोड दोन्ही प्रकरणातील मुलींना तात्काळ  न्याय मिळावा..! भरचौकात फाशी द्या! कायद्याचे राज्य आहे हे दाखवून द्या... बाकी आरोपींची जात पाहून उसळणारे महाभाग कलंक आहेत महाराष्ट्रावर!’ अनिल दाहोत्रे यांनी म्हटले की, ‘हिंगणघाट पीडितेचा संघर्ष थांबला, भावपूर्ण श्रद्धांजली अत्याचाराला हैदराबाद...’ नितीन झिंजाडे यांनी म्हटले की, ‘हिंगणघाट घटनेतील पिडीत युवतीची मृत्यूशी झुंज अखेर संपली. पाहाते तिने या जगाचा निरोप घेतला आहे. अश्रुपूर्ण श्रद्धांजली.’ मिनाथ मते यांनी म्हटले की, ‘अखेरचा श्‍वास मावळला’,  विकास नारवडे यांनी म्हटले की, ‘ सिलोडमधील महिला ही मरण पावली आणि आता हिंगणघाट तरुणी. दोन्ही आरोपीला शिक्षा झाली पाहिजे.’, श्रृती धानोरकर- भोयर यांनी म्हटलय की, ‘ आरोपीला फाशी हीच खरी श्रद्धांजली’, मकरंद डोईजाद यांनी म्हटलंय की, ‘ ज्या देशातील सरकार व्यापारात आणि उद्योगात व्यस्त असते, त्या देशातील कायदा व सुव्यवस्था निश्‍चितपणे उध्वस्त असते.’ गंगाप्रसाद परदेशी यांनी म्हटले की, ‘आम्हीपण हरलो, भावपूर्ण श्रद्धांजली’.

...तर मुली पुढाकार कधी घेणार?

काय आहे घटना...
३ फेब्रुवारीला वर्धा जिल्ह्यातील हिंगणघाटच्या नंदोरी चौक परिसरात दारोडा येथील ३० वर्षाच्या प्राध्यापिका तरुणीच्या अंगावर विकेश नगराळे या तरुणाने पेट्रोल टाकून पेठवून दिले. त्यात ती २० ते ३० टक्के भाजली. त्यानंतर संशयित आरोप पसार झाला होता. पोलिसांनी त्याला तत्काळ ताब्यात घेऊन अटक केली. पीडित प्राध्यापीकेवर नागपूर येथे उपचार सुरु होते. दरम्यान तिचा सोमवारी (ता. १०) सकाळी ६.५५ मिनिटांनी मृत्यू झाला. त्यानंतर सर्वस्तरातून संताप व्यक्त केला जात आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Anger in Hinganghat burning case