अक्कलकोट तालुक्‍यात कोरोनाने आणखी एकाचा मृत्यू; 25 जणांचे घेतले स्वॅब 

सकाळ वृत्तसेवा
Monday, 15 June 2020

अक्कलकोट येथे पुन्हा दोन कोरोनाबधित रुग्णाच्या संपर्कात असलेल्या 25 जणांचे स्वॅब घेण्यात आले, अशी माहिती तहसीलदार अंजली मरोड यांनी दिली. 

अक्कलकोट (सोलापूर) : अक्कलकोट येथे पुन्हा दोन कोरोनाबधित रुग्णाच्या संपर्कात असलेल्या 25 जणांचे स्वॅब घेण्यात आले, अशी माहिती तहसीलदार अंजली मरोड यांनी दिली. 
रविवारी सकाळी मैंदर्गी (ता. अक्कलकोट) येथील 80 वर्षांचे डॉक्‍टर तसेच अक्कलकोट शहरातील म्हाडा कॉलनी येथे राहणारी 51 वर्षीय महिला हे दोघेही सोलापुरात लक्षणे जाणवत असल्याने खासगी रुग्णालयात उपचार घेत आहेत. त्यांचा स्वॅब घेण्यात आला असता ते दोघेही कोरोनाबधित असल्याचे आढळून आले आहेत. त्यामुळे त्या दोघांच्या निकट संपर्कात असलेले एकूण 25 जणांचे स्वॅब आज घेण्यात आले आहेत. दरम्यान, आज करजगी (ता. अक्कलकोट) येथेही एका 76 वर्षीय वृद्ध पुरुषाचे कोरोनामुळे निधन झाले आहे. दरम्यान, रविवारी घेतल्या गेलेल्या 23 स्वॅबपैकी 21 स्वॅब अहवाल निगेटिव्ह आले असून दोन स्वॅब रद्द झाले आहेत. 

सोलापुरातील बातम्या वाचण्यासाठी येथे क्‍लिक करा 
तालुक्‍यात पाच ठिकाणी जनता कर्फ्यू 

अक्कलकोटला पुकारलेल्या जनता कर्फ्यूचा आज सोमवारी शेवटचा दिवस आहे. तर निंबाळ (कर्नाटक) येथे दोन रुग्ण हे दुधनी शेजारी आढळल्याने दुधनी येथे पाच दिवस, मैंदर्गी येथे रुग्ण आढळल्याने तिथे आठ दिवस, हिरोळी (कर्नाटक) येथे सहा रुग्ण आढळल्याने शेजारी वागदरीत पाच दिवस तर आज करजगी येथे एक कोरोनाबाधित रुग्ण मयत निघाल्याने तिथे पाच दिवस असे तालुक्‍यातील तिन्ही नगरपरिषदसह दोन मोठ्या गावात जनता कर्फ्यूचे आयोजन करण्यात आले आहे. दरम्यान, मंगळवारपासून अक्कलकोट येथील सर्व व्यवहार पूर्ववत सुरू होणार आहेत. 

दृष्टिक्षेपात अक्कलकोट तालुका कोरोना रुग्ण स्थिती 

  • - एकूण कोरोना रुग्ण : 17 
  • - एकूण मृतांची संख्या : 4 
  • - उपचार घेऊन घरी गेले : 7 
  • - उपचार चालू असलेले रुग्ण : 6 
  • - अहवाल प्रतीक्षेत असलेले स्वॅब : 25 
  • - संस्थात्मक विलगीकरण व्यक्ती संख्या : 25 
  • - गृह विलगीकरण व्यक्ती संख्या : 154 (मैंदर्गी)

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Another dead by corona in Akkalkot taluka in solapur district