कोरोनासाठी मदत करा, अभिषेक करून प्रसाद घरी पाठवू; श्री स्वामी समर्थ समाधी मठाचा उपक्रम

Appeal for help on Corona background in Akkalkot
Appeal for help on Corona background in Akkalkot

क्कलकोट (सोलापूर) : अक्कलकोट येथील श्री स्वामी समर्थ समाधी मठाने कोरोना व्हायरसच्या आजाराशी लढा देण्यासाठी एक अभिनव संकल्पना राबविली आहे. स्वामी भक्तांनी कोरोनाविरुद्धाच्या लढ्यासाठी पंतप्रधान व मुख्यमंत्री सहायता निधीस मदत करावी, त्याबदल्यात आम्ही आपल्या वतीने स्वामी समर्थांना अभिषेक करून प्रसाद व अंगारा स्वखर्चाने आपणांस घरपोच करू, असे आवाहन मठाच्या वतीने करण्यात आले आहे. 
याबाबत अधिक माहिती देताना धनंजय पुजारी म्हणाले, की येत्या 20 एप्रिलला श्री स्वामी समर्थ पुण्यतिथी महोत्सव आहे. नेमके याच काळात आपण सर्व जण महाभयंकर विषाणूशी लढा देत आहोत. या कार्यात समस्त यंत्रणा केंद्र व राज्य सरकार सर्वतोपरी लढा देत आहे. यावेळी दरवर्षी आपण स्वामी सेवा म्हणून जे दान व धर्म करत होता ती रक्कम किंवा कमीत कमी 251 रुपये तरी आपण पीएम व सीएम केअरला मदत पाठवा आणि त्यानंतर त्याची माहिती सोबत दिलेल्या लिंकवर जमा केलेल्या रकमेच्या पावतीचा फोटो, आपले नाव, पत्ता, गोत्र आदी http://shriswamisamarth.info/Appeal-to-donate-cm-pm-care-fund या 
लिंकवर भरून पाठवावी. त्यानंतर लॉकडाउन संपल्यावर आपल्या नावे अभिषेक करून स्वामीविभूती, अंगारा व प्रसाद स्वखर्चाने आपणस घरपोच पाठविण्यात येणार आहे. मी स्वतः पंतप्रधान व मुख्यमंत्री सहायता निधीत देखील प्रत्येकी 11 हजार रुपये रक्कम जमा केली आहे. आपणही या राष्ट्र सेवेतून स्वामी सेवा करण्याच्या संधीचा लाभ अवश्‍य घ्यावा, असे आवाहन धनंजय पुजारी यांनी केले. आपल्या घरीच स्वामी पुण्यतिथी साजरी करून वेगळ्या पद्धतीने स्वामींना अभिवादन करा. आपले स्वामी नक्कीच आपल्याला या संकटातून तारतील असे आवाहन शेवटी करण्यात आले आहे. 
 

राष्ट्रसेवा रूपी स्वामी कार्य 
मला विश्‍वास आहे की आध्यात्मिक उपासना आपण करतच आहोत. त्यासोबतच हे राष्ट्रसेवा रूपी स्वामी कार्य करणारच आहात तसेच आपल्या संपर्कातील सर्व लोकांपर्यंत देखील माझे आवाहन पोचवावे, अशी अपेक्षा आहे. 
- धनंजय नंदकुमार, पुजारी, श्री स्वामी समर्थ समाधी मठ, अक्कलकोट

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com