सांगोला तालुक्‍यातील 16 ग्रामपंचायतींचा कारभार सहा प्रशासकांवर

दत्तात्रय खंडागळे 
Wednesday, 2 September 2020

राज्यात सुरू असलेला कोरोनाचा कहर तसेच लॉकडाउनमुळे मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायतीवर प्रशासक नियुक्त करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. त्यानुसार सांगोला तालुक्‍यातील 16 ग्रामपंचायतींवर सहा प्रशासकांची नियुक्ती करण्यात आली आहे. 

सांगोला (सोलापूर) : ऑगस्ट महिन्याच्या 28 व 29 तारखेला मुदत संपलेल्या 16 ग्रामपंचायतीवर प्रशासकपदी विस्तार अधिकाऱ्यांची नियुक्ती जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रकाश वायचळ यांनी केली आहे. सहा विस्तार अधिकारी 16 ग्रामपंचायतीचे प्रशासक म्हणून काम पाहणार असून त्यांना मुंबई ग्रामपंचायत अधिनियम 1958 मधील तरतुदीनुसार सरपंचपदाचा अधिकार व कर्तव्ये प्राप्त होणार आहेत. 
राज्यात सुरू असलेला कोरोनाचा कहर तसेच लॉकडाउनमुळे मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायतीवर प्रशासक नियुक्त करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. सांगोला तालुक्‍यातील आलेगांव, आगलावेवाडी, बामणी, चोपडी, देवळे, एखतपुर, गायगव्हान, हलदहिवडी, महिम, मेडशिंगी, नाझरे, निजामपूर, संगेवाडी, सोमेवाडी, तरंगेवाडी, वासुद या 16 ग्रामपंचायतीची मुदत ऑगस्ट महिन्यातील 28 व 29 तारखेला संपत आहे. सांगोला तालुक्‍यातील मुदत संपलेल्या 17 ग्रामपंचायतीवर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रकाश वायचळ यांनी सहा विस्तार अधिकारी यांची प्रशासक म्हणून नियुक्ती केली आहे. 
सांगोला तालुक्‍यातील मुदत संपलेल्या आलेगांव, आगलावेवाडी, हलदहिवडी ग्रामपंचायतीच्या प्रशासकपदी विस्तार अधिकारी एम. एस. सावंत, बामणी, चोपडी, देवळे ग्रामपंचायतीच्या प्रशासकपदी विस्तार अधिकारी एस. बी. घाडगे, एखतपुर व गायगव्हाण ग्रामपंचायतीच्या प्रशासकपदी विस्तार अधिकारी जे. एन. टकले, महिम व संगेवाडी ग्रामपंचायतीच्या प्रशासकपदी विस्तार अधिकारी एस. जे. नागटिळक, मेडशिंगी, नाझरे व सोमेवाडी ग्रामपंचायतीच्या प्रशासकपदी विस्तार अधिकारी वाय. एस. गोटे, निजामपूर, तरंगेवाडी व वासुद ग्रामपंचायतीच्या प्रशासकपदी विस्तार अधिकारी व्ही. के. काळूखे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. 

संपादन : वैभव गाढवे 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Appointment of Administrator in 16 Gram Panchayats of Sangola taluka