ब्रेकिंग : सोलापूर जिल्ह्याच्या पालक सचिवपदी उद्योग, उर्जा व कामगार विभागाचे प्रधान सचिव बी वेणूगोपाल

Appointment of B Venugopal as Guardian Secretary of Solapur District
Appointment of B Venugopal as Guardian Secretary of Solapur District
Updated on

सोलापूर : सोलापूर जिल्ह्याच्या पालक सचिवपदी बी वेणूगोपाल यांची नियुक्ती झाली आहे. सोलापुरातील कोरोना व्हायरसचा वाढता प्रादुर्भव पहाता सोलापूरला पालक सचिव नेमण्यात यावा, अशी मागणी नागरिकांकडून करण्यात आली होती. 
सोलापुरात कोरोना व्हायरसाचा प्रादुर्भव वाढत असताना त्याला आटोक्यात आणण्यासाठी जिल्हा पालक सचिव पदाच्या अधिकाऱ्याची गरज होती. काही दिवसापूर्वी महाराष्ट्र नव निर्माण सेनेनी पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांच्याकडे जिल्हा पालक सचिव पादाच्या अधिकाऱ्याची मागणी केली होती. राज्यातील रिक्त झालेल्या जिल्हा पालक सचिव पदांवर आज नियुक्त्यांचे आदेश जारी करण्यात आले आहेत. यामध्ये सोलापूर जिल्ह्यासाठी उद्योग, उर्जा व कामगार विभागाचे प्रधान सचिव (उद्योग) बी. वेणूगोपाल यांची तर जालना जिल्ह्यासाठी सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाचे सचिव पराग जैन नैनुटिया यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

बी. वेणूगोपाल यांनी यापूर्वी सोलापूरला जिल्हाधिकारी म्हणून काम पाहिले आहे. सध्या जिल्ह्यात वाढणाऱ्या कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर त्यांची नियुक्ती पालक सचिव म्हणून झाल्याने सोलापुरातील कोरोना व्हायरसला आटोक्यात आणण्यासाठी मदत होणार का असा प्रश्‍न केला जात आहे. काही दिवसांपूर्वी महाराष्ट्र नव निर्माण सेनेनी पालकमंत्र्यांकडे पालक सचिव म्हणून नियुक्ती करावी अशी मागणी केली होती. तेव्हा चांगला अनुभवी व सक्षम अधिकारी तात्काळ नेमावा अशी निवेदनाद्‌वारे मागणी केली होती. जेव्हा इतर ठिकाणी रुग्ण सापडत होते. तेव्हा सोलापूर जिल्ह्यात एकही रुग्ण नव्हता. मात्र १२ एप्रिलला सोलापुरमध्ये पहिला रुग्ण सापडला आणि त्यानंतर रुग्णांची सध्या वाढत गेली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com