दवाखान्यांच्या बिलांवर लक्ष ठेवण्यासाठी भरारी पथकाची नियुक्ती 

corona
corona

सोलापूर : कोरोनाच्या उपचारासाठी खासगी रुग्णालयांकडून आणि रुग्णवाहिकांकडून वाजवी शुल्क आकारले जातात का याची पाहणी करण्यासाठी जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी भरारी पथकाची नियुक्ती केली. जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी अर्जुन गुंडे पथकाचे प्रमुख आहेत. या पथकात जिल्हा पुरवठा अधिकारी उत्तम पाटील, अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.मोहन शेगर, कार्यकारी अभियंता संभाजी धोत्रे सदस्य आहेत. त्याचबरोबर जिल्हा परिषदेचे लेखा आणि कोषाधिकारी महेश अवताडे सदस्य सचिव आहेत. 

कोरोनाबाधितांवर वाजवी दरात उपचार मिळण्यासाठी शासनाने निश्‍चित करुन दिलेल्या दरानुसार उपचार होतात की नाही? खासगी रुग्णालयांनी खाटा उपलब्ध करून देणे व त्याच्या अधिसूचनेच्या प्रभावी अंमलबजावणीचेही निर्देश देण्यात आले आहेत. अद्यापही, खासगी रुग्णालयांमध्ये उपचार घेत असलेल्या कोरोनाबाधित रुग्णांकडून जास्तीचे शुल्क आकारले जात असल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. या निर्णयांची प्रभावी आणि काटेकोरपणे अंमलबजावणी होण्यासाठी जिल्हाधिकारी आणि महापालिका आयुक्तांनी तसेच विभागीय आयुक्तांनी देखील त्यांच्या स्तरावर भरारी पथक नेमण्याचे निर्देश आरोग्यमंत्री राजेश टोपे दिले होते. त्यानुसार हे भरारी पथक नियुक्त केले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com