जिल्हा नियोजन मंडळांतर्गत जिल्हा नगरोत्थान योजनेतून मंगळवेढा नगरपरिषदेस 2 कोटी 5 लाख रुपये मंजूर

हुकूम मुलाणी 
Wednesday, 27 January 2021

जिल्हा नियोजन मंडळ अंतर्गत जिल्हा नगरोत्थान योजनेतून नगरपरिषदेस 2 कोटी 5 लाख रुपये निधी मंजूर झाल्याची माहिती जिल्हा नियोजन समिती सदस्य अजित जगताप यांनी दिली. शहरातील विविध प्रभागातील कामांना निधी उपलब्ध करण्याकरिता प्रस्ताव जिल्हाधिकारी कार्यालयाकडे पाठविण्यात आला. पुढील कामाकरिता 2 कोटी 5 लाख रुपये निधी मंजूर करण्यात आला. 

मंगळवेढा (सोलापूर) : जिल्हा नियोजन मंडळ अंतर्गत जिल्हा नगरोत्थान योजनेतून नगरपरिषदेस 2 कोटी 5 लाख रुपये निधी मंजूर झाल्याची माहिती जिल्हा नियोजन समिती सदस्य अजित जगताप यांनी दिली. शहरातील विविध प्रभागातील कामांना निधी उपलब्ध करण्याकरिता प्रस्ताव जिल्हाधिकारी कार्यालयाकडे पाठविण्यात आला. पुढील कामाकरिता 2 कोटी 5 लाख रुपये निधी मंजूर करण्यात आला. 

सि. स. नं. 4457 या जागेवर आरक्षण क्र. 9 संपूर्ण आरसीसी कंपाउंड घेऊन बगीचा विकसित करणे, शिवप्रेमी चौक ते सावंत साहेब ते खंडोबा गल्ली मंदिरापर्यंत कॉंक्रिट रोड करणे, नागणेवाडी कारखाना रोडवरील दबडे लाकूड अड्डा ते रामकृष्ण नागणे घरापर्यंत गटार करणे, दामाजी गृहनिर्माण संस्थेमधील नगरपरिषद मालकीच्या सि. स. नं. 31/8/1 या ओपन स्पेसमध्ये बगीचा करणे, आत्तार बागवान तांबोळी समाजाच्या स्मशानभूमीस आरसीसी टेरकेस 2 नग करणे, आत्तार बागवान तांबोळी समाजाच्या स्मशानभूमीसाठी पाण्याचा हौद बांधकाम करणे, खोमनाळ नाका सि. स. नं. 2864 मध्ये सामाजिक, सांस्कृतिक सभागृह बांधणे, हिंदू स्मशानभूमी कंपाउंड वॉल चेन लिंक आणि मारवाडी समाज स्मशानभूमी कट्टे व पेव्हर ब्लॉक बसविणे, बाबासाहेब माने घर ते पिंटू माने व इतर 12 ठिकाणी गटार करणे, मंगळवेढा शहरातील इंगळेवाडा, धोंडीराम राऊत व इतर 14 ठिकाणी पेव्हर ब्लॉक बसविणे, शहरातील सि. स. नं. 4526 या जागेतील शाही जामा मस्जिद मुस्लिम समाज येथे पायाभूत सुविधा करणे, मुलाणी गल्ली येथील सि. स. नं. 832 या जागेतील इमारतीवर पहिला मजला बांधकाम करणे व इतर सार्वजनिक सुविधा करणे. 

ही कामे मंजुरीकरिता पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांना आदेश दिले व त्यानुसार मंजुरी मिळाली. ही कामे मंजूर करण्याकरिता राष्ट्रवादी प्रदेश उपाध्यक्ष दीपक साळुंखे, विठ्ठल कारखान्याचे चेअरमन भगीरथ भालके, राष्ट्रवादीचे जिल्हा सरचिटणीस लतीफ तांबोळी, जिल्हा प्रशासन अधिकारी पंकज जावळे यांचे सहकार्य लाभले. मुख्याधिकारी निशिकांत प्रचंडराव व नगराध्यक्षा अरुणा माळी, उपनगराध्यक्ष चंद्रकांत घुले, बांधकाम समिती सभापती प्रवीण खवतोडे, नियोजन सभापती अनिल बोंदाडे, महिला व बालकल्याण सभापती भागीरथी नागणे, आरोग्य सभापती संकेत खटके व नगरसेविका अनिता नागणे, राजश्री टाकणे, सुमन शिंदे, फकीर सब्जपरी अरिफ, पांडुरंग नाईकवाडी, लक्ष्मी म्हेत्रे, पारूबाई सिद्राम जाधव, रामचंद्र कोंडुभैरी, निर्मला माने, रतन पडवळे, प्रशांत यादव, बशीर बागवान, राहुल सावंजी यांनी ही कामे मंजूर करण्यासाठी प्रयत्न केले. 

संपादन : श्रीनिवास दुध्याल


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Approved funds to Mangalvedha Municipal Council from District Urban Development Scheme under District Planning Board