तुमच्या मोबाईलमधील आरोग्य सेतू ॲप सुरु आहे का?

Is the Arogya Setu app on your mobile
Is the Arogya Setu app on your mobile
Updated on

सोलापूर : कोरोना व्हायरसचा विळखा दिवसेंदिवस वाढत आहे. दिवसेंदिवस रुग्णांच्या संख्येत वाढ होत असल्यामुळे राज्य सरकारने ३१ मेपर्यंत चौथा लॉकडाउन वाढवला. कोरोना विषयी जनजागृती करण्यासाठी आणि लोकांपर्यंत सत्य माहिती पोहोचवण्यासाठी केंद्र सरकारने ३ एप्रिलला आरोग्य सेतू ॲप लॉन्च केले. देशातील सर्वांनी हे ॲप डाऊनलोड करण्याचे आवाहनही आरोग्य मंत्रालयाकडून करण्यात आले आहे. परंतु काही जणांनी आरोग्य सेतू ॲप डाऊनलोड करून लॉग इन केला आहे. तरीसुद्धा काही दिवसांतच हे आरोग्य सेतू ॲप आपोआपच लॉग आऊट झाले आहे. हे ॲप का लॉगआऊट झाले आहे, हॅक तर झाले नाही ना असा प्रश्‍न आता ॲप वापर करत्यांना पडला आहे.
एकीकडे सरकार सुरक्षेसाठी अॅपचा वापर करण्यास सांगत आहेत तर दुसरीकडे असे लॉग आऊट केले जात आहे. अशावेळी पुन्हा आरोग्य सेतू अॅप लॉग इन करावं की नाही, असे काहींच्या मनात प्रश्न निर्माण होत आहेत. सुरूवातीला या अॅपमध्ये स्वतः ची पूर्ण माहिती संकलित केली गेली आहे. त्यात असे लॉग आऊट केले जात आहे. त्यामुळे अनेकांच्या मनात भिती निर्माण झाली आहे. आपल्या वैयक्तिक माहितीचा कुणीही गैरवापर तर करत नाही ना, अशी शंका निर्माण केली जात आहे.
कोरोनाव्हायरसची जोखीम कितपत आहे, याबाबत आकलन करणारे हे ॲप नॅशनल इॅफोममेटिक्स सेंटरकडून लॉन्च केले आहे. जोपर्यंत कोरोनावर लस निर्माण होत नाही. तोपर्यंत आपल्याला सोशल डिस्टन्सिंग, हात धूत राहणे या गोष्टी सतत कराव्या लागतील. पण यालाच जोड देत केंद्र सरकारने कोरोनाची माहिती देण्यासाठी तसेच आपण कोणाला भेटतो, कुठे जातो, तिथे कोरोनाचे रुग्ण आहेत का? अशा प्रश्नांची उत्तरे देण्यासाठी तसेच कोरोनाव्हायरस बाबत अलर्ट करण्यासाठी सरकारकडून आरोग्य सेतू ॲप तयार केले आहे. 
सोलापुरातील बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
आरोग्य सेतू ॲपने दिलेल्या माहितीनुसार आरोग्य सेतू ॲप वापरकर्ता ॲपमध्ये नोंदणी करताना संपर्काबाबतची माहिती जमा करतो. वापरकर्त्याच्या भागात कोरोना रुग्ण आढळल्यास त्याच्या स्थानाबाबत माहिती मिळते आणि ही माहिती सुरक्षित सर्व्हरमध्ये सेव्ह केली जाते. कोरोनाव्हायरस संदर्भातील माहिती देण्यासाठी केंद्र सरकारने लॉन्च केलेले आरोग्य सेतू ॲप सर्व खासगी आणि सरकारी कर्मचारी तसेच कंटेनमेंट झोनमध्ये राहणाऱ्या सर्व नागरिकांसाठी आरोग्य सेतू ॲप बंधनकारक करण्यात आले आहे. सोलापुरातील एकाने नाव ना छापण्याच्या अटीवर मोबाईलमधील ॲप अचानक लॉग आऊट झाल्याचे सांगितले आहे.

ॲप हॅक झाले म्हणणे चुकीचे
इथिकल हॅकर सूरज वाघमारे म्हणाले, आरोग्य सेतू अॅप हॅक झाले म्हणणे चुकीचं ठरेल. हॅक तेव्हा म्हणले जाते जेव्हा एखाद्या अॅप वापरणाऱ्यांची माहिती इतरांना कळते, जसे की नाव, मोबाइल नंबर किंवा पत्ता. आरोग्य सेतू अॅपमध्ये असे काहीच घडत नाही. परंतु आरोग्य सेतू अॅप हे वापरकर्त्याच्या गोपनीयतेचा भंग करतो हे नक्की. सरकार आरोग्य सेतू ॲपचा वापर करून नागरिकांच्या हालचालींचा मागोवा घेऊ शकतो परुंतु तो चर्चेचा दुसरा मुद्दा ठरेल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com