'फौजदार चावडी' हद्दीत वाढताहेत चोरी ! अंधारात महिलांचे सोने लुटणारा जेरबंद

0Crime_Story_0.jpg
0Crime_Story_0.jpg

सोलापूर : फौजदार चावडी पोलीस ठाण्यातील अधिकाऱ्यांच्या बदल्या झाल्यानंतर या परिसरात चोरीचे प्रमाण वाढू लागले आहे. गुरुवारी (ता. 12) मध्यरात्रीच्या सुमारास नवीपेठेतील तीन दुकानांची दुकाने फोडून चोरट्याने दुकानातील एक लाख 82 हजार 500 रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला आहे.

नवीपेठेतील आरती कलेक्‍शन, ओम जीन्स कॉर्नर आणि सर्वोदय ट्रेडर्स या दुकानांचे शटर चोरट्यांनी तोडले. तत्पूर्वी, चोरट्याने सरगम रेडीमेड या दुकानातील सव्वालाख रुपये चोरून नेले होते. त्यानंतर चोरट्यांनी आरती कलेक्‍शन हे दुकान फोडून दुकानातील 45 हजार रुपये रोख आणि ओम जीन्स कॉर्नर या दुकानांमधून 12 हजार 500 रुपयांचे कपडे चोरट्यांनी लंपास केले. घटनेची माहिती मिळताच संबंधित दुकानदारांनी त्या ठिकाणी धाव घेतली. त्यानंतर हेमंत केशवजी गोगरी (रा. आशिर्वाद अपार्टमेन्ट, रेल्वे लाईन) यांनी फौजदार चावडी पोलिसांत फिर्याद दिली त्यानुसार सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री. देशमाने हे या घटनेचा पुढील तपास करीत आहेत.

 

अंधारात महिलांचे सोने लुटणारा जेरबंद
सोलापूर : निर्जनस्थळी व अंधाराचा फायदा घेऊन महिलांच्या गळ्यातील सोन्याचे दागिने जबरदस्तीने हिसकावून नेणाऱ्या दुचाकीस्वाराला पोलिसांनी अटक केली आहे. अबुल हसन सलिम इराणी (रा. कचरा डेपोजवळ, मोमीनपुरा, कडलास रोड) असे त्या संशयितांचे नाव आहे.

सिव्हिल हॉस्पिटलच्या बाजूस एका मुलाच्या हातातील मोबाइल दुचाकीवरुन आलेल्या दोघांनी हिसकावून नेला. तत्पूर्वी, त्या संशयित चोरट्याने जुना अक्‍कलकोट नाका, इंदिरा नगर, संतोष नगर, नडगिरी पेट्रोलपंपाजवळ, हत्तुरे वस्ती (विवेकानंद नगर) याठिकाणी चोरट्याने महिलांच्या गळ्यातील दागिने चोरून नेले. अबुल हा सांगोल्यावरून देगावमार्गे सराफ बाजारात जाणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानंतर पोलिस उपनिरीक्षक शैलेश खेडकर यांनी त्यांच्या पथकाने सापळा रचला. दुचाकीवरुन सोलापुकरकडे निघालेल्या दुचाकीस्वाराला पोलिसांनी पकडले. त्याच्याकडून दोन लाख पाच हजार रुपयांचे दागिने आणि 22 हजारांचा मोबाइल पोलिसांनी जप्त केला. ही कारवाई पोलिस उपनिरीक्षक खेडकर यांच्या पथकाने केली. त्यात पोलिस हवालदार अशोक लोखंडे, इमाम इनामदार, शंकर मुळे, राजेश चव्हाण, विजयकुमार वाळके, संदीप जावळे, संतोष येळे, योगेश सावंत, सुुहास अर्जून, संतोष वायदंडे, संजय काकडे, नरेंद्र नक्‍का यांचाही समावेश होता.

घराच्या गच्चीवरून चोर शिरला घरात
सोलापूर : अक्कलकोट रोडवरील कल्पना नगरातील संतोष शिवशरण सिंदगी यांच्या राहत्या घराच्या गच्चीवरून चोरट्यांनी घरात प्रवेश केला. त्यानंतर किराणा दुकानातील गळ्यात ठेवलेली चावी घेऊन बाजूला असलेल्या किराणा साहित्य ठेवण्याच्या रूममध्ये तो गेला. त्याठिकाणी असलेले लोखंडी कपाट उघडून चोरट्याने लॉकरमध्ये ठेवलेले दागिने व रोख रक्कम लंपास केले, अशी फिर्याद संतोष सिंदगी यांनी एमआयडीसी पोलिस ठाण्यात नोंदविली आहे. चोरट्याने घरातील पाच हजार रुपयांची रोकड आणि दोन लाख 81 हजार रुपयांचे सोन्या-चांदीचे दागिने लंपास केल्याचेही फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. या घटनेचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री. माळी यांच्याकडे सोपवण्यात आला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com