
पंढरपूर ः येत्या आषाढी यात्रेच्या पार्श्वभूमीवर पंढरपूर नगरपरिषदेने कोरोना विषाणूंचा प्रादुर्भाव व संसर्ग रोखण्यासाठी अनेक उपाययोजना सुरू केल्या आहेत. बाहेर गावाहून येणाऱ्या कोणालाही मठांमध्ये वास्तव्यास ठेवू नये अन्यथा संबंधितांच्या विरुद्ध आपत्ती व्यवस्थापन कायद्याअंतर्गत कारवाई केली जाईल असा इशारा नगरपालिकेने दिला आहे. तथारी पंढरपुरात आलेल्या नंदू महाराज कुकरमुंडे यांना भेटून नगरपालिका अधिकाऱ्यांनी त्यांना सन्मानाने परत पाठवले.
यात्रेच्या पार्श्वभूमीवर पंढरपूर नगरपरिषदेने कोरोना विषाणूंचा प्रादुर्भाव व संसर्ग रोखण्यासाठी अनेक उपाययोजना सुरू केल्या आहेत. शहरातील सुमारे 450 मठधारकांनी आपल्या मठांमध्ये तसेच इमारती मध्ये कोणत्याही बाहेर गांवावरून आलेल्या नागरिकांना, वारकऱ्यांना प्रवेश देऊ नये अथवा वास्तव्यास ठेवू नये. असा प्रकार निदर्शनास आल्यास त्यांच्यावर आपत्ती व्यवस्थापन कायद्याअंतर्गत कारवाई केली जाईल अशा नोटिसा बजावण्यात आलेल्या आहेत
दरम्यान काही महाराज मंडळी व वारकरी आजही पंढरपूर मध्ये दाखल होत आहेत. आज सकाळीच नंदू महाराज कुकरमुंडे हे पंढरपुर शहरात नदीजवळील त्यांचे मठात दाखल झाल्याची माहिती उपविभागीय अधिकारी सचिन ढोले, मुख्याधिकारी अनिकेत मानोरकर यांना मिळाली. सदरची माहिती मिळताच उपविभागीय अधिकारी सचिन ढोले व मुख्याधिकारी अनिकेत मानोरकर यांनी दूरध्वनीद्वारे कुकरमुंडे महाराज यांच्याशी संपर्क साधला व सध्या कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता आपण पंढरपूर शहरामध्ये राहू नये अशी विनंती केली. सदर विनंती कुकरमुंडे महाराज यांनी मान्य केली आणि आपण आज पंढरपूर शहर सोडत असल्याचे सांगितले. त्यावर पंढरपूर नगरपरिषद चे मुख्याधिकारी अनिकेत मानोरकर ,उपमुख्याधिकारी सुनील वाळूजकर यांनी समक्ष कुकरमुंडे महाराज मठात जाऊन त्यांची भेट घेतली. आपण
नगरपालिकेची सूचना मान्य केली आहे. त्याबद्दल आभारी आहे तरी आपण त्वरित शहराचे बाहेर जाण्यासाठी निघावे अशी विनंती केली. कुकुरमुंडे महाराज त्यांनी ही लगेच प्रतिसाद देत कुटुंबातील सदस्यासह ते मठाचे बाहेर पडले. त्यांना पंढरपूर शहराच्या बाहेर असलेल्या अहिल्या पुलाच्या तपासणी नाक्याजवळ नेऊन त्या ठिकाणी सन्मानपूर्वक त्यांना हार देऊन त्यांचा सन्मान मुख्याधिकारी अनिकेत मानोरकर यांनी केला आणि यापुढे पंढरपूर शहरांमध्ये आपण व आपले भावीक पाठवू नयेत अशी विनंती केली. त्यानंतर नंदकुमार कुकरमुंडे महाराज हे आपल्या नंदुरबार या मूळ गावी परत निघून गेले.
यावेळी बोलताना मुख्याधिकारी अनिकेत मानोरकर यांनी सांगितले की, नगरपरिषदने मठ व इमारती चे निगराणी करणेसाठी 36 कर्मचाऱ्यांची निगराणी पथके तयार केली आहेत. सदर निगराणी पथके वेळोवेळी या संबंधित मठांना, इमारतींना भेटी देत आहेत. जर या निगराणी पथकास एखाद्या मठाधिपती आणि किंवा इमारत मालकांनी भाविकांना वास्तव्यासाठी जागा दिल्याचे निदर्शनास आल्यास संबंधित मठाधिपती किंवा इमारत मालक यांच्यावर आपत्ती व्यवस्थापन कायदा अंतर्गत कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे असा इशारा मुख्याधिकारी यांनी दिला आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.