अक्कलकोट तालुक्‍यात कोरोनाचा चढता आलेख कायम; रविवारी आढळले पाच बधित 

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 28 जून 2020

अक्कलकोट कोरोनाची स्थिती (28 जून) 

  • एकूण कोरोनाबधित रुग्ण : 67 
  • आतापर्यंत झालेले एकूण मृत्यू : 05 
  • बरे होऊन घरी गेलेले रुग्ण संख्या : 12 
  • उपचार सुरू असलेले रुग्ण : 50 

अक्कलकोट (सोलापूर): अक्कलकोट तालुक्‍यात आज सकाळी आणखी पाच कोरोनाबधित रुग्णांची भर पडली असून त्यात शनिवारी रात्री माणिक पेठ (अक्कलकोट) येथील मृत्यू झालेल्या महिलेचा समावेश आहे, अशी माहिती तहसीलदार अंजली मरोड यांनी दिली आहे. यामुळे अक्कलकोट तालुक्‍यात एकूण कोरोनाबधित रुग्णांची संख्या आता 67 इतकी झाली आहे. 
नवीन पाच रुग्णांपैकी एक रुग्ण हा शनिवारी रात्री मृत झाला असून ती महिला माणिक पेठे येथे राहते. तसेच शुक्रवारी विविध रुग्णांच्या संपर्कात आलेल्या 53 जणांचे स्वॅब घेण्यात आले होते. त्याचा अहवाल आज सकाळी मिळाला आहे. त्यामध्ये चार पॉझिटिव्ह, 22 निगेटिव्ह, एक रद्द अहवाल तर 6 प्रलंबित अहवालांचा असा समावेश आहे. त्याचप्रमाणे आज सकाळी आढळलेल्या चार रुग्णांपैकी तीन रुग्ण बुधवार पेठ येथील आहेत. बस स्थानकापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या बुधवार पेठेत आता एकूण रुग्ण संख्या ही तेरा झाली आहे. तर एक रुग्ण हा माणिक पेठ येथील आहे. 

अक्कलकोट शहर अपडेट 
अक्कलकोट शहरात एकूण 35 रुग्ण असून त्यात मौलाली गल्ली (4), बुधवार पेठ (13), मधला मारुती परिसर (7), मुजावर गल्ली (1), बागवान गल्ली (1), म्हाडा कॉलोनी (2), होटकर गल्ली (2), संजय नगर (1), इंदिरा नगर झोपडपट्टी (1), आझाद नगर (1), माणिक पेठ (2) या रूग्णांचा समावेश आहे. यातील चार जणांचा मृत्यू झाला आहे. 11 जण उपचारानंतर बरे झाले असून 20 जणांवर उपचार सुरू आहेत. 

अक्कलकोट ग्रामीण अपडेट 
अक्कलकोट ग्रामीण भागात 32 रुग्ण असून यात समर्थ नगर (7), मैंदर्गी (6), करजगी (4), पिरजादे प्लॉट (1), देशमुख बोरगाव (5), हंजगी (1), सलगर (4), गुरववाडी (3), अक्कलकोट ग्रामीण (1) यांचा समावेश आहे. यातील एकाचा मृत्यू झाला असून एक रुग्ण बरे होऊन घरी गेला आहे. तर 30 तीस जणांवर सध्या उपचार सुरू आहेत, अशी माहिती तहसीलदार अंजली मरोड यांनी दिली आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Ascending graph of corona in Akkalkot taluka five patients found on Sunday