मोठी बातमी ! बाजार समितीत दहा वाजता कांद्याचे लिलाव; नियम मोडणाऱ्या व्यापाऱ्याचा परवाना होणार निलंबित

तात्या लांडगे
Sunday, 28 February 2021

जिल्हा उपनिबंधक कुंदन भोळे म्हणाले... 

 • बाजार समितीत केली जाणार जागोजागी हात धुण्यासाठी पाण्याच्या टाकीची व्यवस्था 
 • शेतकरी, हमाल, तोलार, व्यापाऱ्यांनी मास्क वापरणे बंधनकारक 
 • मास्क अथवा सोशल डिस्टन्सिंगचे पालन न केल्यास भरावा लागणार प्रत्येकी एक हजारांचा दंड 
 • सूचना करुनही नियम मोडल्यास संबंधित व्यापाऱ्याचा परवाना 30 दिवसांसाठी होईल रद्द 
 • बाजार समिती करेल स्पीकरद्वारे कोरोनासंबंधीची जनजागृती; थर्मल गन बाजार समितीने घ्याव्यात 
 • तापमान जास्त असल्यास, लक्षणे असलेल्या शेतकरी, व्यापाऱ्याला हॉस्पिटलमध्ये दाखल करावे 
 • लॉकडाउन होणार नसल्याने कोणीही अफवांवर विश्‍वास ठेवून बाजार समितीत गर्दी करु नये 
 • बाजार समितीतील किरकोळ भाजी विक्रीत्यांना सकाळी नऊपर्यंतच त्याठिकाणी थांबता येणार
 • सकाळी 10 वाजल्यापासून कांद्याचे लिलाव होणार आहेत. व्यापाऱ्यांनी त्यांच्याकडे येणाऱ्या शेतकऱ्यांना मास्क द्यावे

सोलापूर : बाजार समितीच्या मुख्य प्रवेशद्वारावर आता शेतकरी व व्यापाऱ्यांना थर्मल स्क्रिनिंग करुनच बाजार समितीत प्रवेश दिला जाणार आहे. बाजार समितीतील किरकोळ भाजी विक्रीत्यांना सकाळी नऊपर्यंतच त्याठिकाणी थांबता येणार असून सकाळी 10 वाजल्यापासून कांद्याचे लिलाव होणार आहेत. व्यापाऱ्यांनी त्यांच्याकडे येणाऱ्या शेतकऱ्यांना मास्क द्यावे. नियम मोडणाऱ्यांना सूचना करुनही निर्बंधांचे उल्लंघन करणाऱ्या व्यापाराचा परवाना 30 दिवसांसाठी रद्द केला जाणार आहे. लॉकडाउन होणार नसून नागरिकांनी अफवांवर विश्‍वास ठेवू नये. किरकोळ भाजीपाला खरेदीसाठी ग्राहकांनी बाजार समितीत गर्दी करुन नये. कोरोनाचा प्रसार वाढू नये नये म्हणून हे निर्णय घेतल्याची माहिती जिल्हा उपनिबंधक कुंदन भोळे यांनी 'सकाळ'शी बोलताना दिली. 

जिल्हा उपनिबंधक कुंदन भोळे म्हणाले... 

 • बाजार समितीत केली जाणार जागोजागी हात धुण्यासाठी पाण्याच्या टाकीची व्यवस्था 
 • शेतकरी, हमाल, तोलार, व्यापाऱ्यांनी मास्क वापरणे बंधनकारक 
 • मास्क अथवा सोशल डिस्टन्सिंगचे पालन न केल्यास भरावा लागणार प्रत्येकी एक हजारांचा दंड 
 • सूचना करुनही नियम मोडल्यास संबंधित व्यापाऱ्याचा परवाना 30 दिवसांसाठी होईल रद्द 
 • बाजार समिती करेल स्पीकरद्वारे कोरोनासंबंधीची जनजागृती; थर्मल गन बाजार समितीने घ्याव्यात 
 • तापमान जास्त असल्यास, लक्षणे असलेल्या शेतकरी, व्यापाऱ्याला हॉस्पिटलमध्ये दाखल करावे 
 • लॉकडाउन होणार नसल्याने कोणीही अफवांवर विश्‍वास ठेवून बाजार समितीत गर्दी करु नये 
 • बाजार समितीतील किरकोळ भाजी विक्रीत्यांना सकाळी नऊपर्यंतच त्याठिकाणी थांबता येणार
 • सकाळी 10 वाजल्यापासून कांद्याचे लिलाव होणार आहेत. व्यापाऱ्यांनी त्यांच्याकडे येणाऱ्या शेतकऱ्यांना मास्क द्यावे

महापालिका आयुक्‍त पी. शिवशंकर यांनी नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कडक कारवाईचे आदेश दिले आहेत. महापालिकेचे कर्मचारी दरररोज कोणकोणत्या भागात जातात, कितीजणांवर कारवाई करतात, याचा आढावा ते दररोज घेत आहेत. या पार्श्‍वभूमीवर आज श्रीकृष्ण मंगल कार्यालयावर दंडात्मक कारवाई करण्यात आली. विवाहात 50 पेक्षा अधिकजणांची उपस्थिती असल्याने मंगल कार्यालयाच्या मालकाकडून 10 हजारांचा दंड वसूल करण्यात आला. तत्पूर्वी, बाजार समितीत पार पडलेल्या बैठकीसाठी जिल्हा उपनिबंधक कुंदन भोळे, जोडभावी पेठ पोलीस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक शिवाजी राऊत, विभागीय कार्यालयाचे श्री. लामखाने, मुख्य आरोग्य निरीक्षक केदार गोटे, आरोग्य निरीक्षक धीरज वाघमोडे, आरोग्य निरीक्षक संग्राम पाटील, महापालिकेकडून सहायक आयुक्‍त विक्रमसिंह पाटील आदी उपस्थित होते. महापालिकेतर्फे मार्केट यार्डातील नागरिकांना व व्यापाऱ्यांना कोरोनासंदर्भात प्रबोधन करण्यात आले. आडत व्यापाऱ्यांनी शेतकऱ्यांना मास्क द्यावे, स्वत:ही त्याचा वापर करावा. नियम मोडणाऱ्यांवर प्रथम दंडात्मक कारवाई केली जाईल. तरीही नियम मोडल्यास त्याचा परवाना 30 दिवसांसाठी निलंबित केला जाणार आहे.

  स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
  Web Title: Auction of onions at ten o'clock in the market committee; The license of the trader violating the rules will be suspended