
सोलापूर : महाराष्ट्र साहित्य परिषद पुणे यांच्यावतीने दरवर्षी मराठी दिनानिमित्त देण्यात येणारे पुरस्कार जाहीर झाले. यंदाच्या पुरस्कारप्राप्त मान्यवर लेखकांमध्ये सोलापूर जिल्ह्यातील दोन लेखकांचा समावेश आहे. ज्येष्ठ साहित्यिक द.ता. भासेले आणि संतोष जाधव यांना पुरस्कार मिळाल्याने सोलापूरचा बहुमान वाढला असून सोलापूरची सांस्कृतिक व साहत्यिक उंची वाढली आहे. 27 फेब्रुवारी रोजी ज्येष्ठ लेखिका मंगला आठलेकर यांच्या हस्ते हा पुरस्कार देऊन श्री.भोसले यांना गौरविण्यात येणार आहे.
पंढरपूर येथील डॉ.द. ता. यांच्या "एक कवी एक कविता' या समीक्षापर पुस्तकाला तर संतोष जाधव यांच्या आंबेगाव तालुक्याचा इतिहास या पुस्तकाला महाराष्ट्र साहित्य परिषदेचे पुरस्कार जाहीर झाले आहेत. ज्येष्ठ साहित्यिक द.ता. भासेले यांच्या "एक कवी एक कविता' या पुस्तकात 12 मान्यवर कवींच्या कवितांचे रसग्रहन केले आहे. यात विंदा करंदीकर यांच्या झपताल, बा.भ.बोरकर यांच्या कांचनसंध्या, आरती प्रभू यांच्या दोन पोक्त पानं, फ.मु. शिंदे यांच्या आई कवितांचा समावेश आहे.
डॉ.द.ता.भोसले यांच्या सर्वोक्तृष्ट ग्रंथांना अनेक पुरस्कार मिळालेले आहेत. प्रामुख्याने महाराष्ट्र शासन, महाराष्ट्र साहित्य परिषद, मराठवाडा साहित्य परिषद, दमाणी साहित्य पुरस्कार, राजर्षी शाहू शिक्षण परिषद पुरस्कार, महर्षी वि.रा.शिंदे पुरस्कार अशा पन्नास हून अधिक पुरस्कारांनी आणि बारा जीवन गौरव पुरस्कारानी त्यांना गौरविण्यात आलेले आहे. लोकसंस्कृती आणि लोकजीवन यांचा त्यांचा विशेष अभ्यास आहे. त्यांच्या काही पुस्तकांच्या हिंदी आवृत्या देखील प्रसिध्द झाल्या आहेत. "संस्कृतीच्या पाऊलखुणा' या नऊ पुरस्कार लाभलेल्या पुस्तकाचा मॅकमिलन प्रकाशनातर्फे इंग्रजीत अनुवाद करण्यात आला आहे.
तीन कादंबऱ्या, दहा कथासंग्रह, सहा ललित लेख संग्रह, पाच वैचारिक ग्रंथ, सहा लोकसंस्कृती वरील ग्रंथ, सहा समीक्षा चरित्रपर ग्रंथ, संपादित ग्रंथ, ग्रामीण बोलीचा शब्दकोश अशा प्रकारची त्यांची विपुल ग्रंथ संपदा प्रकाशित झालेली आहे. अनेक नवोदित लेखकांना त्यांचे मोलाचे मार्गदर्शन आणि सहकार्य मिळालेले आहे. विविध प्रमुख विद्यापीठात पाठ्यपुस्तक म्हणून त्यांच्या ग्रंथांचा समावेश करण्यात आलेला आहे. महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निमिर्ती समितीत सदस्य म्हणून सक्रीय सहभाग घेऊन त्यांनी शासनातर्फे प्रसिध्द झालेल्या क्रमिक पाठ्यपुस्तकांचे संपादन देखील केलेले आहे.
अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन आणि ग्रामीण साहित्य संमेलनामधील परिसंवादात वक्ता तसेच अध्यक्ष म्हणून 25 वेळा त्यांनी सहभाग नोंदवला आहे. एक अभ्यासू वक्ता म्हणून त्यांना समाजमान्यता मिळालेली आहे. रयत शिक्षण संस्थेच्या विविध महाविद्यालयात प्राध्यापक आणि मराठी विभाग प्रमुख म्हणून त्यांनी काम पाहिलेले आहे. त्याच बरोबर उपप्राचार्य आणि प्राचार्य म्हणूनही त्यांनी काही काळ सेवा केली आहे.
कै. द.वा.पोतदार यांच्या स्मृतीप्रित्यर्थ इतिहास विषयक पुस्तकाला दिला जाणारा पुरस्कार बोंडले (ता. माळशिरस) येथील संतोष जाधव यांच्या "आंबेगाव तालुक्याचा इतिहास' या पुस्तकाला घोषित झाला आहे. संतोष जाधव यांचे यापूर्वी आंबेगाव तालुक्यातील स्वातंत्र्यसैनिक या नावाचे एक पुस्तक प्रकाशित झाले आहे. संतोष जाधव यांचे प्राथमिक व माध्यमिक शिक्षण बोंडले येथे तर कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षण अकलूज येथे झाले आहे. त्यांनी इतिहास विषयातील एम ए शिक्षण रयत शिक्ष संस्थेच्या सातारा येथील श्री छत्रपती शिवाजी महाविद्यालयातून "कमवा आणि शिका' योजनेतून घेतले आहे. तर बार्शी येथील राजर्षी शाहू विधी महाविद्यालयातून एलएलबीचे शिक्षण घेतले आहे. मंचर (जि. पुणे) येथील आण्णासाहेब आवटे महाविद्यालयात ते इतिहास विषयाचे सहाय्यक प्राध्यापक आहेत. आंबेगाव तालुक्याचा इतिहास या संदर्भग्रंथात त्यांनी 1929 ते 2009 या कलावधीतील आधुनिक इतिहासाचा मागोवा घेतला आहे. चौदाव्या शतकातील मानवी हत्यारे व मध्ययुगीन, पेशवेकालीन इतिहास या तालुक्याला लाभला आहे. हुतात्मा बाबू गेणू यांचा वारसा या तालुक्याला लाभला आहे. जावध यांच्या दुसऱ्याच पुस्तकाला प्रतिष्ठेचा पुरस्कार मिळाल्याने त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.
संपादन : अरविंद मोटे
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.