पाचशेच्या दंडाऐवजी 15 चा मास्क द्या : "आम आदमी पार्टी'ची मागणी मास्कसंबंधी जनजागृती

सकाळ वृत्तसेवा
Wednesday, 28 October 2020

जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांना निवेदन देऊन दंड आकारण्या ऐवजी 15 रु. ची पावती करुन जाग्यावरच पोलिसांमार्फत मास्क दिले जावेत, जेणेकरुन उद्देश्‍य साध्य होईल व जनतेला आर्थिक झळ बसणार नाही, अशी मागणी आम आदमी पार्टीच्यावतीने करण्यात येणार आहे. 

सोलापूर : मागील अनेक दिवसांपासूनचा सोलापूरात कोरोनाचा कहर सुरूच आहे. शहरातील कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सार्वजनिक ठिकाणी मास्क वापरणे अनिवार्य केले आहे. जे कोणी बिगर मास्क आढळतील त्यांना पाचशे रुपये दंड भरावे लागत आहे. शहरात अनेकजण मास्क न लावता सार्वजनिक ठिकाणी वावरत आहेत. त्यांना पाचशे रुपये दंड आकारण्याऐवजी पंधरा रुपयांची पावती घेण्यास सांगून एक मास्क द्यावा, अशी मागणी आम आदमी पार्टीच्यावतीने करण्यात आली असून शहरात जनजागृती आभियान सुरू करण्यात येत आहे.

आम आदमी पार्टीच्यावतीने पाचशे रुपये भरण्यापेक्षा मास्क वापरण्याबाबत जनजागृती अभियान आम आदमी पार्टीचे वतीने सुरू करण्यात आले आहे. जिथे पोलीसांची कार्यवाही सुरु आहे त्या ठिकाणी पुढे व मागे उभे राहुन मास्क लावा, सामाजिक अंतर ठेवा, गर्दी टाळा कोरोना वर मात करा अशा प्रकारे जनते हातात फलक धरुन जनजागृती करण्यात येणार आहे. 
जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांना निवेदन देऊन दंड आकारण्या ऐवजी 15 रु. ची पावती करुन जाग्यावरच पोलिसांमार्फत मास्क दिले जावेत, जेणेकरुन उद्देश्‍य साध्य होईल व जनतेला आर्थिक झळ बसणार नाही, अशी मागणी आम आदमी पार्टीच्यावतीने करण्यात येणार आहे. 
शहराध्यक्ष अस्लम शेख, निहाल किरनळ्ळी, नासीर मंगलगिरी, रोबर्ट गौडर यांनी या आंदोलनात सहभाग घेतला .

संपादन : अरविंद मोटे 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Awareness about masks from "Aam Aadmi"