
अक्कलकोट (सोलापूर) : नव्या दमाच्या तरुणांना पदे देऊन राष्ट्रवादीची नवी टीम सक्रिय केली आहे. येणाऱ्या काळात या पदाधिकाऱ्यांनी शरद पवार यांच्या विचारांचा अजेंडा घराघरात पोचवल्यास 2024 चा अक्कलकोटचा आमदार राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचा असेल, असा आशावाद राष्ट्रवादी कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष बळिराम साठे यांनी व्यक्त केला.
अक्कलकोट येथे आयोजित राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या पदाधिकाऱ्यांना नियुक्तिपत्रे वाटप व सत्कार समारंभात श्री. साठे बोलत होते. या वेळी जिल्हा उपाध्यक्ष महेश माने, ज्येष्ठ नेते सुरेश सूर्यवंशी, राष्ट्रवादी तालुका अध्यक्ष दिलीप सिद्धे, शहराध्यक्ष मनोज निकम, बाबासाहेब निंबाळकर, सलीम यळसंगी, महिला अध्यक्षा माया जाधव आदी उपस्थित होते. प्रारंभी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे कार्याध्यक्ष माणिक बिराजदार यांनी प्रास्ताविक व स्वागत केले.
श्री. साठे पुढे म्हणाले, अडचणीच्या काळात अनेकजण पक्ष सोडून गेले तरी शरद पवार यांनी न डगमगता पक्षाला उभारी दिली. आज सत्ता आहे. या सत्तेचा उपयोग सर्वसामान्य माणसाच्या हितासाठी झाला पाहिजे, याकरिता प्रत्येक कार्यकर्त्याने झटून काम करण्याची गरज आहे. कोणतेही विकासाचे काम अडल्यास माझ्याशी संपर्क करा. मी स्वतः लक्ष घालून काम पूर्ण होण्यासाठी प्रयत्न करेन.
नूतन जिल्हा उपाध्यक्ष महेश माने म्हणाले, महाराष्ट्रात सर्वत्र भरारी घेणाऱ्या राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाला अक्कलकोटमध्ये आलेली मरगळ नव्या पदाधिकाऱ्यांच्या प्रयत्नांनी निश्चित दूर होणार असून, याद्वारे अक्कलकोटच्या विकासाची खऱ्या अर्थाने सुरवात झाली असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही.
या वेळी सुरेश सूर्यवंशी, दिलीप सिद्धे, बाबासाहेब निंबाळकर, मनोज निकम, शंकर व्हनमाने, अर्जुन बनसोडे, प्रा. ज्ञानेश्वर शिरसाट आदींनी मनोगते व्यक्त केली. या वेळी शहर व तालुक्यातील नूतन पदाधिकाऱ्यांना नियुक्तिपत्रे देऊन सत्कार करण्यात आला.
या वेळी अण्णासाहेब पाटील महामंडळाचे संचालक प्रशांत भगरे, धनाजी मोरे, बादोले येथील धायगोडे व सलगरे या सैन्यात सेवा बजावून निवृत्त झालेल्या जवानांचा सत्कार करण्यात आला.
तालुका उपाध्यक्ष रतन बंगरगी, मैंदर्गी शहर अध्यक्ष राहुल किरनळ्ळी, प्रहारचे गोटू माने, नितीन शिंदे, महादेव वाले, राजरतन बाणेगाव, संजय घोडके, शीतल जाधव, अमरदीप साखरे, मजहर बागवान, राजाभाऊ नवले, सनी सोनटक्के, प्रवीण देशमुख, आकाश शिंदे, बंटी पाटील, विक्रांत पिसे, रमेश म्हमाणे, स्वामिनाथ पोतदार, श्रीनिवास सिंदगीकर, अविराज सिद्धे, नवनीत राठोड, महादेव वाले, संजय घोडके, अर्जुन बनसोडे, विक्रांत पिसे आदी उपस्थित होते.
संपादन : श्रीनिवास दुध्याल
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.