सोलपुरात सुटे सिगारेट, विडी विक्रीवर बंदी  महापालिका आयुक्त पी.शिवशंकर यांनद दिले आदेश : पाकिट विक्री बंधनकारक

सकाळ वृत्तसेवा
Saturday, 26 September 2020

सुटी विडी व सिगारेट विक्रीमुळे व्यसनाधिनता वाढल्याचे निर्दशनास आले आहे. त्यामुळे आता त्यावर बंदी घालण्याचा निर्णय घेण्यात आला असून दुकानदाराला पूर्ण सिगारेट तथा विडीचे पाकीट विकावे लागणार आहे. या निर्णयाची सोलापूर शहरात विभागीय अधिकाऱ्यांमार्फत प्रभावी अंमलबजावणी केली जाणार आहे. 

सोलापूर : राज्यात सिगारेट आणि विडीच्या सुट्या विक्रीवर राज्य सरकारच्या सार्वजनिक आरोग्य विभागाने निर्बंध घातले आहेत. त्यामुळे आता टपरी तथा कोणत्याही दुकानदारांनी ग्राहकांना संपूर्ण पाकिट विक्री करावे. सुटी विडी व सिगारेट विकल्यास दंडात्मक कारवाई करण्यात येईल, असा इशारा महापालिका आयुक्‍त पी. शिवशंकर यांनी दिला आहे. 

राज्यात व्यसनाधिनतेचे प्रमाण वाढत असून महाविद्यालयीन तरुण- तरुणी, शाळांमधील मुलांमध्येही सिगारेटचे व्यसन वाढल्याचे चित्र आहे. दरम्यान, सुट्ट्या स्वरुपात सिगारेट उपलब्ध न झाल्यास व्यसनाधिनता कमी होईल, असा विश्‍वास सार्वजनिक आरोग्य विभागाने व्यक्‍त केला आहे. तत्पूर्वी, राज्य शासनाकडून शाळा आणि महाविद्यालयाच्या 100 मीटर परिसरात सिगारेट आणि तंबाखूजन्य पदार्थाच्या विक्रीवर बंदी घातली आहे. मात्र, सुटी विडी व सिगारेट विक्रीमुळे व्यसनाधिनता वाढल्याचे निर्दशनास आले आहे. त्यामुळे आता त्यावर बंदी घालण्याचा निर्णय घेण्यात आला असून दुकानदाराला पूर्ण सिगारेट तथा विडीचे पाकीट विकावे लागणार आहे. या निर्णयाची सोलापूर शहरात विभागीय अधिकाऱ्यांमार्फत प्रभावी अंमलबजावणी केली जाणार आहे. 

"यामुळे' घेतला निर्णय 
सिगारेट व विडीचे दुष्परिणाम आणि त्यापासून होणाऱ्या नुकसानीची माहिती पाकिटावर छायांकित केलेली असते. हा वैधानिक इशारा धूम्रपान करणारे मनावर घेत नाहीत. तर सुट्या स्वरूपात सिगारेटची जेव्हा विक्री केली जाते, तेव्हा त्या ग्राहकाला अशा प्रकारची कोणतीही सूचना किंवा वैधानिक इशारा लेखी स्वरूपात मिळत नाही. त्यामुळे त्यांना त्याचे गांभीर्य समजत नाही, असा निष्कर्ष सार्वजनिक आरोग्य विभागाने काढला. त्यानुसार हा निर्णय घेण्यात आला असून या निर्णयामुळे व्यसनेच्या आहारी जाणाऱ्यांचे प्रमाण कमी होईल, असा विश्‍वासही व्यक्‍त करण्यात आला आहे. 

संपादन : अरविंद मोटे 

महाराष्ट्र सोलापूर 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Ban on sale of spare cigarettes and vidi in Solapur Order given by Municipal Commissioner P. Shivshankar: Sale of wallets is mandatory