
बार्शी (सोलापूर) : बार्शी शहर अन् तालुक्यातील गुरुवारी कोरोना संसर्गाचे प्राप्त झालेल्या 227 तपासणी अहवालामध्ये 44 जण कोरोनाबाधित आढळले आहेत. शहरातील एकाचा कोरोनामुळे मृत्यू झाला असून बाधितांची एकूण संख्या 1 हजार 539 झाली आहे. अशी माहिती तहसिलदार डी.बी.कुंभार यांनी दिली.
शनिवारी शहरातील 180 व ग्रामीणमधील 47 अहवाल असे 227 अहवाल प्राप्त झाले. यामध्ये शहरातील 17 व ग्रामीणमधील 27 असे 44 जण कोरोनाबाधित आढळले आहेत. शहरातील 28 तर ग्रामीण मधील 26 अशा 54 जणांचा आत्तापर्यंत कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.
शहरातील 163 व ग्रामीण मधील 20 असे 183 जण निगेटिव्ह आढळले आहेत. शहरात 893 तर ग्रामीणमध्ये 646 असे एकूण 1 हजार 539 जण कोरोनाबाधित आहेत. शहरातील पंकज नगर 1, दत्तनगर 3, बाशिंगे प्लॉट 1, धर्माधिकारी प्लॉट 1, नवी चाटे गल्ली 2, सोलापूर रोड 1, गाडेगाव रोड 3, बार्शी गावठाण 1, सुभाषनगर 2, गुंड प्लॉट 1 असे 17 जण पॉझिटिव्ह आढळले आहेत. ग्रामीण भागातील वैराग 7, श्रीपतपिंपरी 1, राळेरास 1 नारी 1, कव्हे 1, कोरफळे 11, धामणगाव 2, खामगाव 3 असे 27 जण नविन कोरोनाबाधित आढळले आहेत .
शहरातील 254 व ग्रामीण भागातील 157 अशा 411 जणांवर उपचार सुरु आहेत. तर आत्तापर्यंत 1 हजार 74 जण उपचार होऊन बरे होऊन गेले आहेत. यामध्ये शहरातील 611 तर ग्रामीण भागातील 463 जण आहेत. सर्दी, खोकला येत असलेले शहरात 37 रुग्ण असून ग्रामीण भागात 10 जण आढळले आहेत. शहरात 170 तर ग्रामीण भागात 43 असे 213 कॅन्टेन्टमेन्ट झोन सुरु आहेत. 28 जणांचे अहवाल प्रलंबित असल्याची माहिती कुंभार यांनी दिली.
संपादन - सुस्मिता वडतिले
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.