बार्शी तालुक्‍यातील रुग्णांची द्विशतकाकडे वाटचाल; सोमवारी आढळले 18 कोरोनाबाधित 

Barshi taluka on Monday found 18 corona affected
Barshi taluka on Monday found 18 corona affected

बार्शी (सोलापूर) : बार्शी शहर आणि तालुक्‍यात कोरोना संसर्गाचा कहर सुरूच आहे. तालुक्‍यात सोमवारी 18 जण कोरोनाबाधित आढळले आहेत. यामध्ये शहरातील दहा व ग्रामीण भागातील आठ जणांचा समावेश आहे. तालुक्‍यात एकूण कोरोनाग्रस्तांची संख्या 197 झाली आहे. आजपर्यंत आठ जणांचा मृत्यू झाला असल्याची माहिती तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. संतोष जोगदंड यांनी दिली. 
बार्शी शहरातीत व्हनकळस प्लॉट एक, मांगडे चाळ दोन तर भवानी पेठ, नाईकवाडी प्लॉट, घोडके प्लॉट, कसबा पेठ, माळी गल्ली, रोडगा रस्ता, आगळगाव रोड येथे प्रत्येकी एक रूग्ण आढळला आहे. ग्रामीण भागात वैराग येथे दोन, मुंगशी एक, काळेगाव एक, सौंदरे एक, बावी एक, सासुरे एक, घाणेगाव येथे एक जण कोरोनाबाधित आढळला आहे. बार्शी शहर व वैराग येथे 147 जणांवर उपचार सुरु असून 42 जण बरे होऊन घरी गेले आहेत. आरोग्य प्रशासनाने ज्या भागात रुग्ण आढळले आहेत तो भाग सील करण्यात आला आहे, अशी माहिती डॉ. जोगदंड यांनी दिली. 
शहरातील वाढती कोरोना बाधितांची संख्या अन्‌ एका पाठोपाठ एक भाग सील होऊ लाग आहेत. त्यामुळे कोरोनाविषयी नागरिकांच्या मनात धास्ती निर्माण झाली आहे. तालुक्‍यातील कोरोनाची परिस्थिती कधी नियंत्रणात येणार, अशी चर्चा शहरवासियांमध्ये सुरु आहे. 

संपादन : वैभव गाढवे 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com