बार्शी तालुक्‍यात 1 हजार 988 शिक्षकांमध्ये 17 शिक्षक आढळले कोरोनाबाधित 

प्रशांत काळे 
Sunday, 22 November 2020

कोरोना विषाणूच्या संसर्गामुळे राज्यभरातील शाळा, महाविद्यालये मागील आठ महिन्यांपासून बंद ठेवण्यात आली होती. सोमवार (ता. 23 नोव्हेंबर)पासून नववी ते बारावी पर्यंतचे वर्ग भरवण्यास शासनाने परवानगी देताच शहर व तालुक्‍यातील शाळा, महाविद्यालयांनी वर्ग सॅनिटाईझ करुन शिक्षक, प्राध्यापकांची कोरोना चाचणी घेण्यात येत असून तालुक्‍यातील 1 हजार 988 शिक्षकांपैकी 17 जण कोरोनाबाधित आढळले आहेत. 

बार्शी (सोलापूर) : कोरोना विषाणूच्या संसर्गामुळे राज्यभरातील शाळा, महाविद्यालये मागील आठ महिन्यांपासून बंद ठेवण्यात आली होती. सोमवार (ता. 23 नोव्हेंबर)पासून नववी ते बारावी पर्यंतचे वर्ग भरवण्यास शासनाने परवानगी देताच शहर व तालुक्‍यातील शाळा, महाविद्यालयांनी वर्ग सॅनिटाईझ करुन शिक्षक, प्राध्यापकांची कोरोना चाचणी घेण्यात येत असून तालुक्‍यातील 1 हजार 988 शिक्षकांपैकी 17 जण कोरोनाबाधित आढळले आहेत. 
बार्शी शहरात खासगी शाळा 21 असून या शाळांमध्ये 315 शिक्षक तर 139 शिक्षकेतर कर्मचारी असे 454 जण काम पाहतात. शहरात नववीमध्ये 2 हजार 288, दहावीमध्ये 2 हजार 270, अकरावी 2 हजार 468, बारावी 2 हजार 748 असे 9 हजार 774 विद्यार्थी-विद्यार्थीनी शिक्षण घेत आहेत. गणित, इंग्रजी अन्‌ विज्ञान या तीन विषयांचे शिक्षण वर्गात देण्यात येणार असून बाकीचे विषय ऑनलाइन शिकवले जाणार आहेत, अशी माहिती शिक्षण मंडळाचे प्रशासन अधिकारी अनिल बनसोडे यांनी दिली. तालुक्‍यात 102 शाळा असून 1 हजार 56 शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी कार्यरत आहेत. नववी ते बारावीपर्यंत शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या 17 हजार 768 आहे. शहर अन्‌ तालुक्‍यात शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची कोरोना चाचणी घेण्यात आली असल्याची माहिती पंचायत समिती शिक्षणाधिकारी साधना काकडे यांनी दिली. 
मागील चार दिवसांपासून शिक्षक, प्राध्यापक अशा 1 हजार 988 जणांची स्वॅब, रॅपिड ऍन्टीजेन तपासणी करण्यात आली असून ता. 19 रोजी 503 जणांमध्ये दोन, ता. 20 रोजी 762 मध्ये पाच, ता. 21 रोजी 653 मध्ये आठ तर ता. 22 नोव्हेंबर रोजी 70 जणांमध्ये दोघे जण असे एकूण 17 जण कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहेत, अशी माहिती तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. रमेश खेंदाड यांनी सकाळ शी बोलताना दिली. 

संपादन : वैभव गाढवे 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: In Barshi taluka out of 1 thousand 988 teachers 17 teachers were found corona positive