ब्युटीपार्लर व्यवसायाला ऐन लग्न सराईत फटका

 To the beauty parlor business Ain lagna sarait phatka
To the beauty parlor business Ain lagna sarait phatka

सोलापूर : फेब्रुवारी ते मे हे लग्नसराईचे महिने. या कालावधीत ब्युटीपार्लर पार्लर व्यवसाय तेजीत असतो. छोट्या व्यावसायिकांपासून मोठे व्यावसायिक या कालावधीत दरमहा 15 ते 50 हजार इतके उत्पन्न मिळवत असतात. मात्र, लॉकडाउनमुळे सर्वच ब्युटीपार्लर व्यावसायिकांना लग्नसराईच्या सिझनला मुकावे लागत आहे. 

एखाद्या घरात विवाह समारंभ म्हटला, की नववधूपासून सर्वच महिलांना मेकअपचे वेध लागतात. यात मेंदीपासून हेअर स्पा, बॉडी स्पा, ब्लीचिंग, वॅक्‍सिंग, हेअर कट, हेअर स्टाईल, हेअर कलरिंग, साडी ड्रेपिंग आदींसाठी मेकअप आर्टिस्ट, ब्युटीशिअन यांना खूप मागणी असते. 15 ते 40 हजार रुपयांपर्यंत मॅरेज पॅकेज ठरलेले असतात. मात्र या वर्षी कोरोना विषाणूची दहशत जगभर पसरली असून, त्याचा संसर्ग रोखण्यासाठी देशभरात लॉकडाउन करण्यात आले आहे. त्याचा सर्वच ब्युटीपार्लर व्यावसायिकांना खूप मोठा फटका बसला आहे. सध्या त्यांच्यावर बेरोजगारीचे संकट ओढवले आहे. 

कोरोनाचा जास्त धोका ब्युटीपार्लरना 
ब्युटीपार्लर व्यवसायात ब्युटीशिअनना कोरोना विषाणूचा धोका जास्त असतो; कारण त्यांचे ग्राहकांशी थेट संपर्क येत असतात. त्यामुळे लॉकडाउननंतर व्यवसाय सुरू झाल्यानंतरही येणारे ग्राहक कोण, कुठले व त्याला कुठले आजार नाहीत ना याचा काही नेम नसल्याने हा व्यवसाय पुढे कसा पार पाडेल, याबाबत ब्युटीपार्लर चालकांमध्ये चिंता व्यक्त केली जात आहे. 

स्वार्थी विचार सोडलाच पाहिजे
लॉकडाउनपासून माझे क्‍लिनिक पूर्णपणे बंदच आहे. कारण आमचे काम हे सेवा क्षेत्रात मोडते. ग्राहकाला स्पर्श करूनच काम करावे लागते. तसेच येणाऱ्या सणावारांचा, लग्न सराईचा, उन्हाळी सुट्यांचे महत्वपूर्ण सीझन निघून चालले आहे. तरीही कोरोनाविरुद्धच्या लढ्यात हा स्वार्थ विचार सोडलाच पाहिजे. पुढे आयुष्य आहे कमवायला. 
- आरती आरगडे, ब्युटीपार्लर चालक 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com