"यामुळे' स्पर्धकांना दिली पुरस्काराची अर्धी रक्कम : डिसले गुरुजी यांचे स्पष्टीकरण 

अरविंद मोटे 
Monday, 18 January 2021

मी शिक्षकच... 
ग्लोबेल टिचर पुरस्कार मिळाल्यानंतर राजकरणात येण्याची ऑफर आपणास आली होती आपण राजकारणात जाणार की वरिष्ठ अधिकारी होणार असा प्रश्‍न विचारल्यानंतर रणजितसिंह डिसले यांनी सांगितले की, शिक्षक हा अखंड विद्यार्थी असतो. मला शिक्षक म्हणूनच काम करायला आवडेल. शिक्षक म्हणून काम करताना जो सर्जनशिलतेला वाव देता येतो. विद्यार्थ्यांना शिकवता शिकवता स्वत:लाही शिकता येते. म्हणून मी अखंड शिक्षकच आहे. यातूनच मला अधिक चांगली सर्जनशीलता जपता येईल

सोलापूर : सात कोटींचा पुरस्कार जिंकल्यानंतर साडेतीन कोटी रुपये इतर स्पर्धकांना वाटण्याचा मनाचा मोठेपणा दाखवणाऱ्या रणजितसिंह डिसले यांनी आपल्या बरोबरचे नऊ स्पर्धकही माझ्याच तोडीचे होते. हा पुरस्कार एकाचवेळी दहा जणांना देता येत नाही, म्हणून त्यापैकी माझ्या एकाची निवड केली. इतर स्पर्धकांचे कार्यही तितकेच मोठे आहे, अशी कबुली देत आपल्या दिलादारपणाची चुणूक दाखवून दिली. "सकाळ' कार्यालयास दिलेल्या सदिच्छा भेटीप्रसंगी ते बोलत होते. 

ग्लोबल टिचर हा सात कोटींचा पुरस्कार जिंकून सोलापूरचे नाव जगाच्या शैक्षणिक इतिहासात सुवर्णक्षराने कोरणारे माढा तालुक्‍यातील परितेवाडी जिल्हा परिषद शाळेचे शिक्षक रणजितसिंह डिसले यांनी आज सकाळ कार्यालास भेट देऊन आपला लोकल ते ग्लोबल हा प्रवास उलगडला. भारतातून जसे मला नामांकन मिळाळे तसेच जगाच्या इतर नऊ देशातूनही विविध शिक्षकांना या पुरस्कारासाठी नामाकंन मिळाले होते. मला केवळ माझ्याच शाळेतील विद्यार्थ्यांचा विकास करायचा नसून माझ्यासह सर्व जगभरातील विद्यार्थ्यांचा विकास व्हावा, ही माझी भावना पुरस्काराची अर्धी रक्कम इतरांना देण्यामागे असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. माझे ज्ञानाचा फायदा केवळ माझ्या शाळेच्या चार भिंतीतील विद्यार्थ्यांपुरते न राहते ते जगभरातील विद्यार्थ्यांना व्हावा, हा यामागील हेतू असल्याचे त्यांनी सांगितले. 

प्रारंभी "सकाळ'चे सहयोगी संपादक अभय दिवाणजी यांनी स्वागत केले. यावेळी भीमा कालवा मंडळाचे अधीक्षक अभियंता जयंत शिंदे, निवृत्त उपअभियंता पी. एस. कांबळे, सर फाउंडेशनचे राज्य समन्वयक सिद्धाराम माशाळे, शिवाजी वडते, मोहन पवार व प्रवीण देशमुख उपस्थित होते. 

मी शिक्षकच... 
ग्लोबेल टिचर पुरस्कार मिळाल्यानंतर राजकरणात येण्याची ऑफर आपणास आली होती आपण राजकारणात जाणार की वरिष्ठ अधिकारी होणार असा प्रश्‍न विचारल्यानंतर रणजितसिंह डिसले यांनी सांगितले की, शिक्षक हा अखंड विद्यार्थी असतो. मला शिक्षक म्हणूनच काम करायला आवडेल. शिक्षक म्हणून काम करताना जो सर्जनशिलतेला वाव देता येतो. विद्यार्थ्यांना शिकवता शिकवता स्वत:लाही शिकता येते. म्हणून मी अखंड शिक्षकच आहे. यातूनच मला अधिक चांगली सर्जनशीलता जपता येईल. 

"सकाळ'च्या उपक्रमाचा गौरवपूर्ण उल्लेख 
रणजितसिंह डिसले यांनी "सकाळ'ने राबवलेल्या "माझी शाळा, गुणवत्ता पूर्ण शाळा' उपक्रमाचा कृतज्ञतापूर्वक उल्लेख केला. सकाळने जिल्ह्यातील जिल्हा परिषदेच्या नाविन्यपूर्ण शाळा निवडून त्या शाळेतील इनोव्हेशन सर फाउंडेशनच्या सहाकार्यने समाजापुढे मांडले होते. त्याची दखल घेत प्रिसिजन फाउंडेशनने जिल्हा परिषद शाळांना एलसिडी प्रोजेक्‍टर भेट दिले होते. लॉकडाउन काळात ऑनलाइन शिक्षणासाठी त्याचा विद्यार्थ्यांना खूप उपयोग झाला. या उपक्रमाचे डिसले गुरुजी यांनी कौतुक केले. 

संपादन : अरविंद मोटे 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: "Because of this, half the prize money was given to the contestants: Disley Guruji's explanation