आशा पद्धतींच्या विवाहांमुळे वाचले कोट्यवधी रूपये

 Because of the marriages of hope methods Billions of rupees saved
Because of the marriages of hope methods Billions of rupees saved
Updated on

मोहोळ (जि. सोलापूर) ः कोरोना आजारामुळे गेल्या सुमारे तीन महिन्यापासून समाजातील अनेक रूढी व जुन्या परंपरा बदलल्या असून मोहोळ तालुक्‍यात सुमारे अडीचशे विवाह साध्या पद्धतीने पार पडले. गर्दी करावयची नाही, सोशल डिस्टन ठेवणे हे नियम पाळत झालेल्या आशा पद्धतींच्या विवाह समारंभामुळे सुमारे साडेसात कोटी रुपयांच्या खर्चाची बचत झाल्याची माहिती पोलीस निरीक्षक सूर्यकांत कोकणे यांनी दिली. 

या संदर्भात गोपनीय विभागाचे हवालदार निलेश देशमुख यांच्याकडून मिळालेल्या माहितीनुसार लॉकडांऊच्या काळात अनेक रूढी परंपरा बंद झाल्या आहेत. सर्वात महत्वाचे म्हणजे लॉकडाऊनच्या अगोदर जे अनेक विवाह जमले होते ते शासनाच्या परवानगीमुळे संपन्न होण्याचे थांबले होते. 
दरम्यान, समाजात बऱ्यापैकी विवाह करावयाचा म्हणले तरी कमीत कमी सुमारे आठ ते दहा लाखाचा खर्च होतोच होतो, मात्र कोरोनाच्या निमित्ताने शासनाने नव्याने जाहीर केलेल्या नियमामुळे लग्नसमारंभातील गर्दीसह विविध प्रथांवर पाणी सोडण्याची पाळी वधूवरांसह पाहुणेमंडळींवर आली आहे. 

सध्या मोहोळ पोलिस ठाण्यात विवाहासाठी सुमारे पन्नास अर्ज परवानगीच्या प्रतीक्षेत आहेत. शहरासह ग्रामीण भागात वस्त्यावर,झाडाखाली,बागेत विवाह होत आहेत. यामध्ये उच्चपदस्थ अधिकाऱ्यांचाही समावेश आहे. ज्या ठिकाणी विवाह झाला आहे त्या ठिकाणचा परिसर सॅनिटायजेशन केला जातो. फिजिकल डिस्टन्सचे पालन करून शासनाचे सर्व नियम पाळून होणाऱ्या विवाह विवाह सोहळ्यास पोलिसांचेही सहकार्य लाभले आहे. 

या साध्या विवाह पद्धतीमुळे यापुढेही लग्न समारंभात लाखो रुपयांचा होणारा खर्च टाळता येऊ शकेल. अशाच पद्धतीने विवाह करावेत अशी मानसिकता वाढीस लागली आहे. पोलिस निरीक्षक सूर्यकांत कोकणे यांनी किमान पंधरा गोरगरिबांच्या विवाह सोहळ्यासाठी उपस्थित राहून कन्यादान ही केली आहे. असा पायंडा जिल्ह्यात मोहोळ पोलिस ठाण्यात प्रथम सुरू केला आहे. या नियमामुळे व साध्या पद्धतीच्या विवाहामुळे नातेवाईकातील संघर्षही कमी झाल्याचे दिसून येत आहे. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com