
सोलापूरः शहरातील भाविन दिलीप चौधरी व सुमित करकमकर यांनी सीए परीक्षेत देशाच्या पातळीवर अनुक्रमे 29 व 34 वी रॅंक प्राप्त केली आहे. यावर्षी सीए परीक्षेचा नव्या अभ्यासक्रमावर आधारित परीक्षेत त्यांनी हे यश मिळवले आहे.
भाविन दिलीप चौधरी हा सोलापूरचे व्यावसायिक दिलीप चौधरी यांचा मुलगा आहे. त्याचे काका हे सीए असून ते मुंबईत असतात. आपण सीए व्हावे ही प्रेरणा त्याने काकाकडून घेतली. भाविनने त्याचे शिक्षण मुंबई येथे घेतले. लहानपणापासून प्रत्येक वर्गात कायम रॅक ठेवत त्याने यशाची कमान नेहमीच उंच ठेवली. झेडपीसीसी व सीपीटी परीक्षेत अनुक्रमाने देशात 19 वी व सोलापूरात 2 रे स्थान मिळवले होते. भाविनने डेलॉईट मध्ये आर्टीकलशिप सुरु केली. दररोज 12- 14 तास अभ्यास करून त्याने हे यश मिळवले. सीए परीक्षा देणाऱ्या त्याच्या मित्राच्या ग्रुपमध्ये सर्वच म्हणजे 15 जण या परीक्षेत यशस्वी झाले आहेत. विशेष म्हणजे भाविनने ही परीक्षा पहिल्याच प्रयत्नात उर्त्तीर्ण केली. भाविनने पुढील काळात अनुभवासाठी मुंबईत राहण्याचे ठरवले असून नंतर त्याने सोलापूरसाठी योगदान देण्याचे ठरवले आहे.
रंगभवन भागात राहणारा सुमित हा डॉ. सुहास करकमकर यांचा मुलगा आहे. सुमितची अभ्यास करण्याची पध्दत ही सेल्फ स्टडीवर आधारीत आहे. त्याने देखील मुंबई येथे पीडब्ल्यूडी कंपनीत आर्टीकलशिप केली. आयसीए ही या क्षेत्रातील संस्था असून या संस्थेच्या वतीने उपलब्ध झालेल्या अत्यंत गुणवत्तापूर्ण स्टडी मटेरीलयलचा सुमितला उपयोग झाला. दररोज सहा ते आठ तास स्वयंअध्ययनावर त्याने भर दिला. पुढील काळात सीएफए (चाटर्ड फायनान्स ऍनालिस) व एमबीए या क्षेत्रात अभ्यास करण्याचे सुमितचे स्वप्न आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.