Big crowd for shopping in Akkalkot against the backdrop of Janata Curfew
Big crowd for shopping in Akkalkot against the backdrop of Janata Curfew

जनता कर्फ्यूच्या पार्श्‍वभूमीवर अक्कलकोटमध्ये खरेदीसाठी मोठी गर्दी

Published on

अक्कलकोट (जि. सोलापूर) : अक्कलकोट तालुक्‍यात कोरोनाचा शिरकाव होऊ नये यासाठी तहसीलदार अंजली मरोड यांनी नागरिकांना शुक्रवार (ता. 24) ते रविवार (ता. 26) या तीन दिवसासाठी जनता कर्फ्यू पाळण्याचे आवाहन केले आहे. या पार्श्वभूमीवर आज अक्कलकोट शहरात खरेदीसाठी नागरिकांची मोठी गर्दी झालेली पहावयास मिळाली. 
कोरोना हा जिवघेणा संपर्कजन्य रोग आहे, हे माहीत असूनही अनेक जण गाफील राहून आपले जीव धोक्‍यात घालत असल्याचे चित्र तालुक्‍यात दिसत आहे. आज अक्कलकोट शहरातील अनेक नागरिकांनी खरेदीसाठी बाहेर गर्दी केली. जसे की तीन दिवस म्हणजे तीन वर्षे आहेत की काय, अशी धारणा करून काही नागरिक कारण नसताना आपली गरज वाढवून घेत असल्याचे चित्र दिसून आले बाजारात सर्व प्रकारचे धान्य मूबलक उपलब्ध असतानाही भविष्यात अडचण येईल, ही भीती सतावून घरी शिल्लक माल ठेण्याकडे कल दिसून येत असून त्यासाठी बाजारात विनाकारण गर्दी वाढताना दिसली. येथील फत्तेसिंह भाजीपाला मार्केटमध्ये आज खरेदीदारांनी गर्दी केल्याने सर्व भाज्या लवकर संपल्या होत्या. या परिस्थितीचा फायदा घेत टोमॅटो व इतर वस्तूंचे भाव दुपटीने वाढले होते. ग्राहकांची जादा खरेदी करण्याची मानसिकता आणि अडचण पाहून काही दुकानदार सर्वच वस्तूंचे भाव कृत्रिमरीत्या वाढवून ग्राहकांची आर्थिक लूट करताना दिसून आले. लॉकडाउन असतानाही इतर अनेक व्यापाऱ्यांना दुकाने उघडण्यास प्रतिबंध असतानाही अर्धवट दुकाने उघडून आतून व्यापार सुरू ठेवल्याने गर्दी वाढत आहे, असल्याचे काही नागरिकांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com