पतंगाच्या मांज्यात अडकलेल्या कोकिळेची पक्षीमित्रांनी केली सुटका 

Bird
Bird
Updated on

केत्तूर (सोलापूर) : दिवाळीची धामधूम सुरू असतानाच जेऊर (ता. करमाळा) येथील बाजार तळाजवळ सकाळी सकाळी विहारासाठी निघालेला एक कोकिळा पक्षी टीव्ही केबलला अडकलेल्या पतंगाच्या मांज्यात अडकून पडल्याने सुटकेसाठी धडपडत होता. या कोकिळा पक्ष्याची सुटका पक्षीमित्र कल्याणराव साळुंखे यांनी त्यांचे सहकारी इम्रान शेख व बाळू माने यांच्या मदतीने केली. 

दिवाळी सणाच्या पहिल्या अंघोळी दिवशी पक्षीमित्र कल्याणराव साळुंखे यांचा मुलगा विराज याने कोकिळा पक्षी टीव्ही केबलला आलेल्या वायरमध्ये अडकलेल्या पतंगाच्या मांज्यात अडकून पडल्याचे पाहिले व त्याने वडिलांना याबाबतची माहिती दिली. साळुंखे यांनी बाहेर येऊन पाहिले असता कोकिळा पक्ष्याचा पाय दोऱ्यात अडकलेला दिसला. दुसरा कोकिळा पक्षी त्याच्या भोवती घिरट्या घालून कुहूऽऽ कुहूऽऽ असा आवाज करीत होता. तर अडकलेल्या कोकिळा पक्ष्याची सुटकेसाठी धडपड सुरू होती. पण या धडपडीत कोकिळा मात्र जास्तच अडकत होता. 

हे पाहून या पक्ष्याची सुटका करण्यासाठी कल्याणराव साळुंखे यांनी प्रयत्न केला व शेजारील काळू माने यांच्याकडून बांबू आणून त्याच्या सुटकेसाठी प्रयत्न केला; परंतु केबल वायर उंच असल्याने तो प्रयत्न सफल झाला नाही. परंतु हे सर्व इम्रान शेख हा तरुण पाहात होता. मदतीसाठी त्याने इमारतीच्या छतावर चढून बांबूच्या साह्याने कोकिळेच्या पायातील अडकलेल्या दोऱ्याला हिसका देऊन दोरा काढला अन्‌ कोकिळा पक्षी बराच प्रयत्न केल्यानंतर निसटला व त्याने हवेत घिरटी घेऊन जवळच्या पिंपळाच्या झाडावर आश्रय घेतला. त्यानंतर जोडीदार कोकिळा पक्ष्याने इमारतीभोवती हवेत फेरफटका मारून पुन्हा तो पिंपळाच्या झाडाकडे गेला. 

एका निरागस पक्ष्याला वाचवल्याचा आनंद मात्र पक्षीमित्र कल्याणराव साळुंखे यांच्या बरोबरच इम्रान शेख व काळू माने यांच्या चेहऱ्यावर स्पष्टपणे दिसून येत होता. 

संपादन : श्रीनिवास दुध्याल

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Semi-Constructed Water Tank Poses Severe Threat to Students
Solapur Hotgi Lake IT Park Project To Get 35 Acres Land As 12 Acres Will Be Reserved For Infrastructure Facilities
Railway Project
Solapur ZP School
Marathi News Esakal
www.esakal.com