esakal | भाजपने रियाज खरादींना दिली 'परिवहन'ची ऑफर ! 'स्थायी' सभापतीपदासाठी अंबिका पाटील प्रमुख दावेदार

बोलून बातमी शोधा

IMG-20210228-WA0416 (1).jpg}

'एमआयएम'चे सदस्य करणार तक्रार
एमआयएमचे काही नगरसेवक विभागीय आयुक्‍तांकडे तक्रार करणार असून रियाज खरादी हे गटनेते नसून त्यांची स्थायीवरील निवड रद्द करण्याची मागणी करणार असल्याची चर्चा आहे. मात्र, महापालिका अधिनियम 19 अ विरोधी पक्षनेता व गटनेत्यासाठी महापौरांची मान्यता लागते. त्यांच्या मान्यतेनुसारच निवड केली जाते. सव्वा वर्षापासून खरादी हे गटनेते म्हणून काम पाहत आहेत. विषय समित्यांच्या निवडीतही खरादी यांच्या पत्रानुसार एमआयएमचे सदस्य निश्‍चित झाले होते. स्मार्ट सिटीच्या सल्लागार समितीमध्येही खरादी यांची निवड आहे. त्यामुळे विभागीय आयुक्‍तांकडे तक्रार दाखल झाल्यानंतर पुढे काय होणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

भाजपने रियाज खरादींना दिली 'परिवहन'ची ऑफर ! 'स्थायी' सभापतीपदासाठी अंबिका पाटील प्रमुख दावेदार
sakal_logo
By
तात्या लांडगे

सोलापूर : विषय समित्यांच्या निवडीत दोनवेळा संधी मिळूनही महाविकास आघाडीतील गटबाजीमुळे एमआयएला यश मिळाले नाही. त्यामुळे आता गटनेता रियाज खरादी यांनी सावध पवित्रा घेत शहराध्यक्ष फारुख शाब्दींकडे गाऱ्हाणे मांडले आहे. तर भाजपने खरादी यांच्या मुलास (अरबाज खरादी) परिवहन सभापतीपदाची ऑफर दिली आहे. त्यामुळे 6 मार्चला होणाऱ्या स्थायी समितीच्या सभापतीपदासाठी कंबर कसली आहे.

'एमआयएम'चे सदस्य करणार तक्रार
एमआयएमचे काही नगरसेवक विभागीय आयुक्‍तांकडे तक्रार करणार असून रियाज खरादी हे गटनेते नसून त्यांची स्थायीवरील निवड रद्द करण्याची मागणी करणार असल्याची चर्चा आहे. मात्र, महापालिका अधिनियम 19 अ विरोधी पक्षनेता व गटनेत्यासाठी महापौरांची मान्यता लागते. त्यांच्या मान्यतेनुसारच निवड केली जाते. सव्वा वर्षापासून खरादी हे गटनेते म्हणून काम पाहत आहेत. विषय समित्यांच्या निवडीतही खरादी यांच्या पत्रानुसार एमआयएमचे सदस्य निश्‍चित झाले होते. स्मार्ट सिटीच्या सल्लागार समितीमध्येही खरादी यांची निवड आहे. त्यामुळे विभागीय आयुक्‍तांकडे तक्रार दाखल झाल्यानंतर पुढे काय होणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

महाविकास आघाडीतून शिवसेनेचे अमोल शिंदे हे स्थायी समितीच्या सभापतीपदासाठी प्रमुख दावेदार मानले जात आहेत. विरोधी पक्षनेतेपद स्वत:कडे असतानाही शिंदे यांनी स्थायी समितीचे सदस्यपद मिळविले. स्थायी समितीचे सभापतीपद मिळाल्यानंतर शिंदे विरोधी पक्षनेतेपदाचे राजीनामा देतील. त्यानंतर त्यांच्या जागेवर शिवसेनचे नगरसेवक देवेंद्र कोठे यांना संधी दिली जाणार असल्याची चर्चा आहे. सध्या महाविकास आघाडीतून अमोल शिंदे, उमेश गायकवाड, मनोज शेजवाल, वैष्णवी करंगुळे, परवीन इनामदार, किसन जाधव, आनंद चंदनशिवे हे स्थायी समितीचे सदस्य आहेत. महाविकास आघाडीला स्थायी समितीचे सभापतीपद मिळविण्यासाठी एमआयएमसह भाजपमधील एका सदस्याची मदत घ्यावी लागणार आहे. मात्र, 2019 मध्ये विषय समित्यांच्या निवडीत महाविकास आघाडीने एमआयएमला एक सभापतीपद देऊ केले. परंतु, राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि शिवसेनेच्या भूमिकेमुळे त्यांना त्यावेळी यश मिळाले नाही. आता पुन्हा दोन सभापतीपदाची संधी देऊनही शिवसेनेमुळेच एमआयएमचा पराभव झाला. या पार्श्‍वभूमीवर आता आम्ही महाविकास आघाडीसोबत जाणार नाही, अशी भूमिका एमआयएमने घेतल्याचीही चर्चा आहे.

भाजपकडून अंबिका पाटील प्रमुख दावेदार 
स्थायी समितीत आठ सदस्य असलेल्या भाजपला सभापतीपदासाठी एका सदस्याची गरज लागणार आहे. तर महाविकास आघाडीला नऊ सदस्यांची जुळवाजुळव करावी लागणार आहे. रियाज खरादी यांनी तटस्थ भूमिका घेतली अथवा त्यांनी भाजपला साथ दिल्यास महाविकास आघाडीला झटका बसणार आहे. भाजपने खरादी यांच्या मुलास परिवहन सभापतीपदाची ऑफर दिल्याने भाजपचा सभापती निश्‍चित मानला जात आहे. या पार्श्‍वभूमीवर भाजपकडून अंबिका पाटील या प्रमुख दावेदार समल्या जात असून निवडणुकीपूर्वी धनगर समाजाला आपलेसे करण्याचा प्रयत्न भाजपकडून होऊ शकतो. तर न्यायालयीन वादामुळे संधी न मिळाल्याने आपल्याला पुन्हा संधी मिळावी, अशी मागणी राजश्री कणके यांनी केल्याचीही चर्चा असून आता पक्षश्रेष्ठी कोणाचे नाव अंतिम करणार याची उत्सुकता आहे.