
सोलापूर : भाजपची साथ सोडून शिवसेनेने परांपरागत विरोधक असलेल्या कॉंग्रेस, राष्ट्रवादी कॉंग्रेससोबत हातमिळविणी करीत राज्यात महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाले. त्यानंतर एकटे पडलेल्या भाजपने आता पक्षबांधणी आणखी मजबूत करण्याकडे लक्ष केंद्रीत केले असून त्यासाठी जुन्या- नव्यांची मोट बांधणी सुरु केली आहे. 2012 मध्ये महापालिका निवडणुकीत नगरसेवक म्हणून निवडून आलेले अंनत जाधव यांची माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अचानक भेट घेतली. त्यामुळे पक्षापासून दूर गलेले जाधव यांना आता आगामी महापालिका व विधानसभा निवडणुकीत संधी मिळणार, माजी पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांच्या मदतीने जाधव यांचे राजकीय पुनर्वसन होणार अशी चर्चा आता सुरु झाली आहे.
देवेंद्र फडणवीस यांनी घेतली होती भेट
पदवीधर व शिक्षक आमदारकी निवडणुकीच्या प्रचारानिमित्त माजी मुख्यमंत्री तथा विद्यमान विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस हे काही दिवसांपूर्वी सोलापूर दौऱ्यावर आले होते. त्यावेळी त्यानंतर सोलापुरातून परत जाताना फडणवीस यांनी नियोजित दौऱ्यात बदल करीत माजी नगरसेवक अनंत जाधव यांची अचानकपणे भेट घेतली. त्यावेळी त्यांचे राजकीय पुनर्वसन होणार, राज्यात महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाल्यानंतर आमदार विजयकुमार देशमुख यांच्या मदतीने आगामी विधानसभा निवडणुकीत शहर मध्य विधानसभा मतदारसंघात भाजपचाच उमेदवार विजयी व्हावा, यादृष्टीने नियोजन सुरु झाले आहे. तत्पूर्वी, आगामी महापालिका निवडणुकीत या मतदारसंघात भाजपची ताकद वाढविण्याची जबाबदारी अनंत जाधव यांच्यावर सोपविल्याचीही चर्चा आहे. दरम्यान, महापालिका निवडणुकीपूर्वी अन्य पक्षातील विद्यमान व माजी नगरसेवक भाजपमध्ये प्रवेश करतील, असा विश्वास भाजप पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे.
केंद्रीय मंत्र्यांच्या सभा, कार्यक्रमांचे अचूक नियोजन करण्यात जाधव अग्रेसर आहेत. 2012 मध्ये प्रथम नगरसेवक झाल्यानंतर त्यांच्यावर गुन्हा दाखल झाल्याने त्यांचे नगरसेवक पद रद्द झाले होते. त्यानंतर त्यांच्याजागी संजय कोळी यांना संधी मिळाली आणि कोळी हे नगरसेवक झाले. पुढे ते सभागृह नेताही झाले. पूर्वी माजी खासदार ऍड. शरद बनेसोडे यांच्या आणि आता अनंत जाधव यांच्या मालकीच्या सात रस्ता येथील 'वर्षा' बंगल्यावर माजी मुख्यमंत्र्यांनी अचानक भेट घेताना आमदार विजयकुमार देशमुख हे त्याचे साक्षीदार ठरले. त्यावेळी महापालिका असो वा विधानसभा निवडणुकीत जोमाने काम करा, असा सल्ला फडणवीस यांनी जाधव यांना दिल्याचेही बोलले जात आहे. त्यादृष्टीने त्यांनी तयारी सुरु केल्याचीही चर्चा आहे. मात्र, जाधव यांना महापालिका निवडणुकीत संधी मिळणार की विधानसभा निवडणुकीत त्यांना उमेदवारी मिळणार हे आगामी काळात स्पष्ट होणार आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.