प्रत्येक गावात घ्यावे रक्तदान शिबिर; कोण म्हणाले ते वाचा 

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 28 जून 2020

सोलापूर ः कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे विविध रूग्णालयात रक्ताचा तुटवडा भासत आहे. त्यामुळे भारतीय जनता युवा मोर्चाच्या वतीने सामाजिक बांधलकी म्हणून रक्तदानाचा उपक्रम राबवला आहे. दक्षिण सोलापूर तालुक्‍यातील प्रत्येक गावात असा उपक्रम राबविण्याचे आवाहन भाजपचे युवा नेते मनिष देशमुख यांनी केले. 

कारकल (ता. दक्षिण सोलापूर) येथे भाजयुमोच्यावतीने आयोजित रक्तदान शिबिराचे उद्‌घाटन श्री. देशमुख यांच्या हस्ते झाले, त्यावेळी ते बोलत होते. कारकल येथील रक्तदान शिबिरात 51 जणांनी सहभाग नोंदवला. यावेळी पंचायत समिती सदस्य महादेव कमळे, हणमंत कुलकर्णी, विश्‍वनाथ हिरेमठ, अमोगसिद्ध थोरात, महेश मेंडकुदळे, सोमनाथ बगले, प्रभाकर बिराजदार, तम्माराया हंजगी, दिलीप गुड्डेवाडी, श्रीशैल गुड्डेवाडी, पंचाक्षरी इंडी, तुकाराम काटकर, पिंकू बिराजदार, राहूल बिराजदार, शिवानंद जोडमोटे, महादेव बिराजदार, बाबागौडा बिराजदार उपस्थित होते. हे रक्तदान शिबिर भाजयुमोचे तालुका उपाध्यक्ष इरप्पा बिराजदार यांच्या वाढदिवसानिमित्त घेण्यात आले. दक्षिण सोलापूर तालुक्‍याबरोबरच सोलापूर शहरातही भाजयुमोच्यावतीने रक्तदान शिबिरांचे आयोजन केले होते. रक्तदान ही काळाची गरज असल्याने या शिबिरांचे शहरातील विविध ठिकाणी आयोजन केले होते. लोकांना जीवनदान देण्यासाठी रक्तदान हे उपयुक्त दान असल्याचेही श्री. देशमुख यांनी यावेळी बोलताना सांगितले. 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Blood donation camps to be held in every village; Read who said that