मुख्यमंत्र्यांच्या आवाहनाला 'युवा'ची साथ ! युवासेनेच्या पुढाकारातून रक्‍तदात्यांनी जोपासली सामाजिक बांधिलकी

तात्या लांडगे
Wednesday, 9 December 2020

संकट काळात युवासेनेची सामाजिक बांधिलकी 
कोरोना महामारीच्या पार्श्‍वभूमीवर राज्यभर दरवर्षीप्रमाणे रक्‍तदान शिबिरे होऊ शकली नाहीत. त्यामुळे राज्यात रक्‍ताचा तुटवडा जाणवू लागला असून रक्‍त न मिळाल्याने कोणत्याही रुग्णाचा मृत्यू होऊ नये या हेतूने मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी सामाजिक संघटनांसह आदींना रक्‍तदानाचे आवाहन केले. संकट काळात सामाजिक बांधिलकी जोपासण्याच्या हेतूने युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे, युवासेनेचे सचिव वरुण सरदेसाई आणि सोलापूरचे संपर्कप्रमुख विपुल पिंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली आज युवासेनेतर्फे आयोजित महारक्‍तदान शिबिरात सुमारे तीनशे रक्‍तदात्यांनी रक्‍तदान केल्याची माहिती युवासेनेचे शहरप्रमुख विठ्ठल वानकर यांनी सांगितले.

सोलापूर : राज्यात रक्‍ताचा तुटवडा असल्याने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यभरात रक्‍तदान शिबिरांचे आयोजन करण्याचे आवाहन केले. त्याला प्रतिसाद देत युवासेनेच्या वतीने राज्यभर महारक्‍तदान शिबिरांचे आयोजन करण्यात आले. सोलापूर शहरातील युवासेनेतर्फे आयोजित रक्‍तदान शिबिरात सुमारे तीनशेहून अधिक रक्‍तदात्यांनी सामाजिक बांधिलकी जोपासली.

संकट काळात युवासेनेची सामाजिक बांधिलकी 
कोरोना महामारीच्या पार्श्‍वभूमीवर राज्यभर दरवर्षीप्रमाणे रक्‍तदान शिबिरे होऊ शकली नाहीत. त्यामुळे राज्यात रक्‍ताचा तुटवडा जाणवू लागला असून रक्‍त न मिळाल्याने कोणत्याही रुग्णाचा मृत्यू होऊ नये या हेतूने मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी सामाजिक संघटनांसह आदींना रक्‍तदानाचे आवाहन केले. संकट काळात सामाजिक बांधिलकी जोपासण्याच्या हेतूने युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे, युवासेनेचे सचिव वरुण सरदेसाई आणि सोलापूरचे संपर्कप्रमुख विपुल पिंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली आज युवासेनेतर्फे आयोजित महारक्‍तदान शिबिरात सुमारे तीनशे रक्‍तदात्यांनी रक्‍तदान केल्याची माहिती युवासेनेचे शहरप्रमुख विठ्ठल वानकर यांनी सांगितले.

शहर युवा सेनेतर्फे निलमनगर येथील नवदुर्गा देवस्थान परिसरात युवासेनेचे शहरप्रमुख विठ्ठल वानकर यांच्या मार्गदर्शनाखाली अमर बोडा आणि अमितकुमार गडगी यांनी आयोजित केलेल्या महारक्तदान शिबिराचे उद्‌घाटन शिवसेनेचे शहरप्रमुख गुरूशांत धुत्तरगावकर यांच्या हस्ते झाले. यावेळी शिवसेनाप्रमुख स्व. बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून रक्तदानास प्रारंभ झाला. यावेळी युवासेनेचे जिल्हाप्रमुख मनीष काळजे यांच्या हस्ते रक्‍तदात्यांना प्रमाणपत्र वितरित करण्यात आले. सिद्धेश्‍वर रक्तपेढीच्या सहकार्याने रक्तदान शिबीर पार पडले. यावेळी शहरप्रमुख धुत्तरगावकर म्हणाले, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांच्या आवाहनाला प्रतिसाद देऊन युवकांनी हे शिबिर यशस्वी ेकेल्याने निश्‍चितपणे रक्ताचा तुटवडा कमी होईल. शिबिर यशस्वी होण्यासाठी योगेश भोसले, शुभम घोलप, रोहित हंचाटे, सचिन गंधुरे, आनंद मुसले, श्रीनिवास गणेरी, वासू गुत्तीकोंडा, नरेश सायपूर, आनंद सायपूर, अंबादास मंथा आदींनी परिश्रम घेतले. दरम्यान, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख गणेश वानकर यांच्यासह अन्य पदाधिकाऱ्यांच्या सहकार्यातून देगाव येथेही रक्‍तदान शिबिर पार पडले.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Blood donors cultivate social commitment through the initiative of Yuvasena