
वरिष्ठांच्या मार्गदर्शनामुळे मिळाले बळ
कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांवर वेळेत उपचार व्हावेत म्हणून महापालिकेच्या माध्यमातून बॉईज हॉस्पिटलमध्ये स्वतंत्र बेड उपलब्ध करुन दिले. याठिकाणी गर्भवती महिला, प्रसुती झालेल्या महिलांसह 60 वर्षांवरील 80 वर्षांपर्यंतच्या रुग्णांवर यशस्वीपणे उपचार करण्यात आले.
- डॉ. लता पाटील, वैद्यकीय अधिकारी, बॉईज हॉस्पिटल, सोलापूर महापालिका
सोलापूर : शहरात महापालिकेचे 15 नागरी आरोग्य केंद्रे असून, त्यातील कन्ना चौक परिसरातील बॉईज हॉस्पिटलमध्येच कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार केले जात आहेत. रुग्णालयाच्या परिसरात कामगार वस्ती, झोपडपट्ट्यांची संख्या लक्षणीय आहे. या पार्श्वभूमीवर प्रशासनाने त्याठिकाणी 56 ऑक्सिजन बेडची सोय करुन कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार सुरु केले आहेत. आतापर्यंत या रुग्णालयातून 214 रुग्ण बरे होऊन घरी परतले असून, त्यात तब्बल 113 रुग्ण को-मॉर्बिड होते.
वरिष्ठांच्या मार्गदर्शनामुळे मिळाले बळ
कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांवर वेळेत उपचार व्हावेत म्हणून महापालिकेच्या माध्यमातून बॉईज हॉस्पिटलमध्ये स्वतंत्र बेड उपलब्ध करुन दिले. याठिकाणी गर्भवती महिला, प्रसुती झालेल्या महिलांसह 60 वर्षांवरील 80 वर्षांपर्यंतच्या रुग्णांवर यशस्वीपणे उपचार करण्यात आले.
- डॉ. लता पाटील, वैद्यकीय अधिकारी, बॉईज हॉस्पिटल, सोलापूर महापालिका
कोरोनाचा प्रादुर्भाव अद्याप कमी झालेला नसून, आज शहरातील गणेश नगर, दक्षिण कसबा, विडी घरकूल, आंबेडकर नगर, शुक्रवार पेठ, हांडे प्लॉट, शिवगंगा नगर (शेळगी), महेश कॉलनी (सम्राट चौक), बॉम्बे पार्क, गवळी वस्ती, निराळे वस्ती, आंबेडकर नगर, जवाहरलाल हौसिंग सोसायटी, बुधवार पेठ, जुनी लक्ष्मी चाळ, जुना संतोष नगर, शिवगंगा नगर (जुळे सोलापूर) आणि समर्थ नगर (उत्तर सदर बझार)येथे 22 रुग्ण आढळले आहेत. त्यातील काही रुग्ण बॉईज हॉस्पिटलमध्ये दाखल झाले आहेत. शहरातील 11 हजार 134 रुग्णांपैकी 10 हजार 113 रुग्ण बरे झाले आहेत. त्यात बॉईज हॉस्पिटलमधील 214 रुग्णांचा समावेश आहे. दिलासादायक बाब म्हणजे या रुग्णालयात दाखल झालेल्या 80 वर्षीय महिलेनेही कोरोनावर मात केली असून, आतापर्यंत एकाही रुग्णाचा मृत्यू झालेला नाही. शहरातील 421 रुग्णांवर सध्या उपचार असून, त्यापैकी 18 रुग्ण बॉईज हॉस्पिटलमधील आहेत. कोरोना रुग्णांना उपचारासाठी साधारणपणे प्रत्येकी दीड ते दोन लाखांपर्यंत खर्च येतो. मात्र, या हॉस्पिटलने 112 रेमडेसिवीरचा वापर करुन 214 रुग्णांवर मोफत उपचार केले आहेत. त्यासाठी महापालिका आयुक्त पी. शिवशंकर, आरोग्याधिकारी डॉ. बिरुदेव दुधभाते यांच्या मार्गदर्शनाखाली वैद्यकीय अधिकारी डॉ. लता पाटील यांच्यासह डॉक्टर, वैद्यकीय कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतल्यानेच ते शक्य झाले आहे.
रुग्णालयाची स्थिती