'मुकेपणा निर्मूलन' प्रकल्प आता ऑनलाइन 

सूर्यकांत बनकर 
शुक्रवार, 15 मे 2020

लॉकडाउन काळात यांची झाली मदत 
कर्णबधिर बालकांचे प्रशिक्षण सुरू असताना बालकांची श्रवणयंत्रे, श्रवण यंत्रांचे वायर्स, बॅटरी व अन्य साधने दुरुस्त करण्यासाठी व आवश्‍यक साहित्य खरेदीसाठी सोलापूरला जावे लागत होते. पण लॉकडाउन काळात बोलवाडीचे सोलापूर येथील कृष्णात कोळी, अशोक पुजारी, डॉ. विनय चौधरी आणि शैलेश बच्चुवार यांनी काम पूर्ण केले. 

करकंब (ता. पंढरपूर, जि. सोलापूर) ः शेटफळ (ता. मोहोळ) येथील "बोलवाडी' प्रकल्प आणि सोलापूर येथील "प्रिसिजन' कंपनी यांच्या संयुक्त विद्यमाने सोलापूर जिल्ह्यात सुरू असलेला "मुकेपणा निर्मूलन' कार्यक्रम हा महत्त्वकांक्षी प्रकल्प लॉकडाउन काळात "ऑनलाइन' सुरू आहे. अंगणवाडी सेविकांनी जिल्ह्यातील तब्बल दोन लाख 87 हजार बालकांची "ताटवाटी चाचण' घेऊन 147 संशयास्पद कर्णबधिर बालके शोधली आहेत. कर्णबधिरतेच्या दोषाने ती मुकी देखील बनतात. 
आतापर्यंत मोहोळ आणि माढा तालुक्‍यातील 21 बालकांच्या कानाच्या "बेरा' चाचण्या झाल्या. या बालकांना श्रवणयंत्रे लावून प्रत्यक्ष बोलण्याचे प्रशिक्षण सुरू झाले आहे. मात्र, लॉकडाउनने प्रशिक्षणाची अडचण झाली होती. कोळेगाव येथील पालक प्रतिनिधी नामदेव मल्लाव यांनी पालकांना ऑनलाइन पद्धतीने आपल्या पाल्यांच्या भाषा बोलायला शिकवण्यासाठी प्रेरित केले. त्यासाठी व्हाटसऍप ग्रुप केला. ग्रुपवर पालक पाल्याना शिकवितानाचे व्हिडिओ पालकांना पाहण्यास मिळतात. बोलवाडी प्रकल्पच्या अध्यक्षा जयप्रदा भांगे या पालकांना मार्गदर्शन करत आहेत.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The Bolwadi project at Shetfal is now online