मोबाईल किंवा ऍपवरुन कर्ज घेताय ? तर सावधानता बाळगा : रिझर्व्ह बॅंकेचा इशारा 

loan.jpg
loan.jpg

सोलापूर,  मोबाईल किंवा ऍप्सवर कर्ज देण्याच्या नावाखाली होणाऱ्या फसवणूकीबद्दल रिझर्व्ह बॅंकेने ग्राहकांना त्यांची वैयक्तीक माहिती व कागदपत्रे खातरजमा झाल्याशिवाय शेअर करू नयेत असे आवाहन केले आहे. 
जलद व विना अडचण कर्ज मिळण्याची वचने देणाऱ्या अनधिकृत डिजिटल मंच व मोबाईल ऍप्स या गोष्टींना मोठ्या प्रमाणात व्यक्ती व छोटे उद्योजक बळी पडत असल्याचे प्रकार होत आहेत. कर्जदारांकडून अत्याधिक व्याजदर व छुपे आकार मागणी, कर्जवसुलीसाठी अस्वीकार्य आणि दडपशाहीच्या रिती अनुसरणे असे प्रकार होत आहेत. या सोबतच कर्जदारांच्या मोबाईल फोनवरील डेटा मिळविण्यासाठी कराराचा गैरवापर केला जात असल्याचेही संदर्भ मिळत आहेत. 
आरबीआयकडे पंजीकृत केलेल्या बॅंका, वित्तीय कंपन्या आणि संबंधित राज्याच्या कर्ज देण्याबाबतच्या अधिनियमात सारख्या वैधानिक तरतुदीखाली राज्य सरकारकडून विनियमित केली केलेल्या संस्था कर्ज देण्याची कायदेशीर कृती करू शकतात. त्यामुळे ऑनलाइन किंवा मोबाईल ऍ×प्सवर कर्ज देऊन करणाऱ्या कंपन्यांचा खरेपणा व पूर्वइतिहास तपासून घेण्याची गरज आहे. ग्राहकांनी त्यांच्या केवायसी कागदपत्रांच्या प्रती अज्ञात व्यक्ती किंवा सत्यांकन केलेल्या प्रती अनधिकृत ऍप्स बरोबर शेअर करू नयेत. या प्रकारचे ऍप्स संबंधित बॅंक खात्याची माहिती संबंधित कायदा अंमलबजावणी एजन्सीजना कळवावी. ऑनलाईन तक्रार दाखल करण्यासाठी सचेत पोर्टल (http://sachet.rbi.org.in) चा उपयोग कराव. रिझर्व बॅंकेने बॅंका व एनबीएफसीच्या वतीने वापरात येणाऱ्या डिजिटल कर्जदायी प्लॅटफॉर्मसनी त्यांच्या ग्राहकांना बॅंक किंवा बॅंकांची किंवा एनबीएफसीची नावे सुरुवातीलाच सांगावीत. बॅंकेकडे पंजीकृत केलेल्या एनबीएफसीची नावे व पत्ते ऍक्‍सेस केले जाऊ शकतात. आरबीआयकडून विनियमित करण्यात आलेल्या संस्थांच्या विरुद्धच्या तक्रारी दाखल करण्यासाठी ( http://cms.rbi.org.in) या पोर्टलचा उपयोग करावा, नागरिकांनी याबाबत काळजी घ्यावी असे आवाहन रिझर्व बॅंकेच्या वतीने करण्यात आले आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com