दोघेही प्रशासनात अधिकारी; विवाह मात्र शेतात झाडाखाली

Both are officers in the administration but the marriage is under a tree in farm
Both are officers in the administration but the marriage is under a tree in farm

उपळाई बुद्रूक (ता. माढा, जि. सोलापूर) : कोरोनाला रोखण्यासाठी सध्यातरी कोणतेच औषध सापडलेले नाही. त्यामुळे सोशल डिस्टन्स हाच एक उपाय आहे. म्हणून देशासह राज्यात लॉकडाउन करण्यात आला आहे. लॉकडाउनचे उल्लंघन न करता सोशल डिस्टन्स पाळत महाराष्ट्रात अनेक विवाह सोहळा पार पडत आहेत. असाच एक विवाह माढा तालुक्‍यातील उपळाई बुद्रूक येथे पार पडला. विशेष म्हणजे नव वधू-वर दोघेही प्रशासकीय अधिकारी असून हा विवाह शेतात एका झाडाखाली साधेपणाने संपन्न झाला आहे. 
माढा तालुक्‍यातील उपळाई बुद्रूकच्या भाग्याश्री रघुनाथ बेडगे यांचा विवाह चिंचोली येथील विशाल भागवत लोंढे यांच्याशी ठरलेला होता. परंतु सध्या अचानक जगभरात कोरोनाने हाहाकार घातला अन्‌ त्यात सोलापुर जिल्ह्यात या विषाणुचा कहर वाढत चाललेला आहे. अशा परिस्थितीमुळे जमवलेल्या लग्नाच्या तारखा पुढील काही महिन्यात ढकलण्यात येत आहेत. परंतु कोरोनाचा कहर किती दिवस राहिल, हे अद्याप निश्‍चित नसल्याने काही जण चार-चौघात लग्न उरकून टाकत आहे. बेडगे व लोंढे या परिवारने देखील पूर्व नियोजित ठरलेले लग्न शासनाच्या आदेशाचे पालन करत ना बॅडबाजा, ना स्पीकर, ना मंडप, ना कोणताही जल्लोष करत, दोन्ही कुटुंबातील अगदी मोजकी माणसे एकत्र येत शेतातील एका झाडाखाली पार पाडले. यावेळी वधू-वर दोघांनाही तोंडाला मास्क लावले होते. 
लग्न हे आयुष्यातील एक आनंदाचा क्षण असतो व तो स्मरणीय राहण्यासाठी नागरिक काहीही करण्यास तयार असतात. परंतु लॉकडाउनने सगळ्यांची तारांबळ उडालेली आहे. त्यामुळे नागरिकांकडे साधेपणाने घरगुती लग्न लावण्याशिवाय पर्याय उपलब्ध नाही. जसे इतरांचे तसे आपलेच असे म्हणत वनधिकारी असलेले विशाल लोंढे व कर निर्धारण अधिकारी असलेल्या भाग्याश्री बेडगे यांनीही मंगल कार्यालयात आयोजित केलेला विवाह अगदी साधेपणाने शेतातील एका झाडाखाली केला. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com