काळ्या दुचाकीवर आले अन्‌...

Both were custody in connection the Bhalavni shooting
Both were custody in connection the Bhalavni shooting

पंढरपूर (सोलापूर) : पंढरपूर तालुक्यातील भाळवणी येथील विश्वास भागवत यांच्यावर गोळ्या झाडून त्यांची हत्या केल्याच्या प्रकरणी पोलिसांनी भाळवणीतील दोन संशयित आरोपींना ताब्यात घेतले आहे. यातील एक आरोपी अल्पवयीन आहे.
भाळवणी येथील ब्रम्हचैतन्य स्टेशनरी दुकानासमोर तुकाराम आप्पा बंडगर ( वय २७, रा.
केसकरवाडी, ता. पंढरपुर) व त्याचे सहकारी संतोष दतात्रय पाटील, प्रविण उर्फ बाजीराव गायकवाड, दतात्रय मारुती माने, चंद्रकांत रामलिंग देशमुख, गोरख गणपत लिंगे हे सर्वजण गप्पा मारत बसले असताना विक्रमसिंह भिकु म्हमाणे आणि ऋषिकेश उर्फ गणेश दत्तात्रय ताड दोघे (रा. भाळवणी)  हे काळ्या रंगाची स्प्लेंडर मोटारसायकलवरुन तिथे आले. विक्रमसिंह भिकु म्हमाणे याने हातातील पिस्तुलने विश्वास भागवत याचेवर गोळी झाडुन त्यास तु आमच्या जमीनीचे पैसे आम्हांस मागतो का? असे म्हणून विश्वास उर्फ बापू बबन भागवत यांचा खून केला. तेव्हा तुकाराम बंडगर हा पाठीमागे पळाला असता तुकाराम याचेवर पिस्तुलचा फायर करुन जिवे ठार मारण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी तुकाराम आप्पा बंडगर सोडवा- सोडवी करीत असताना विक्रमसिंह याने तुकाराम बंडगर यास तुझपण बघतो, तु वाचलाय असे म्हणाला आणि तुकाराम यास मागुन जोरात ओढले व हाताच्या मुक्क्याने मारुन खाली पाडले.  नंतर ते दोघे मोटर सायकलवरून पळून गेले. सदर घडल्या प्रकाराबाबत तुकाराम आप्पा बंडगर (वय २७, रा. केसकरवाडी, ता. पंढरपुर) यांनी पंढरपुर ग्रामीण पोलिस ठाण्यात संशयित आरोपी विक्रमसिंह भिकु म्हमाणे व ऋषिकेश उर्फ गणेश दत्तात्रय ताड यांचेविरुध्द फिर्याद दाखल केली होती. त्यावरून पंढरपूर ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. पोलिसांनी वेगाने तपास करून गुन्हा घडले पासुन २४ तासांचे आत दोन्ही आरोपींना ताब्यात घेतले आहे. त्यामध्ये गुन्ह्यातील आरोपी विक्रमसिंह भिक म्हमाणे यास अटक करण्यात आली असुन ऋषीकेश उर्फ गणेश दत्तात्रय ताड हा अल्पवयीन असल्याने त्यास ताब्यात घेतले आहे. पोलिस अधिक्षक मनोज पाटील, अपर पोलिस अधिक्षक अतुल झेंडे, उपविभागीय पोलिस 
अधिकारी सागर कवडे, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक अरुण सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली पंढरपुर ग्रामीण पोलिस ठाणेचे पोलिस निरीक्षक प्रशांत भस्मे, सहाय्यक पोलिस निरीक्षक खान, पंढरपुर तालुका पोलिस ठाणेचे पोलिस निरीक्षक किरण अवचर, पंढरपुर शहर पोलिस ठाणेचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक दयानंद गावडे यांनी संशयित आरोपींना पकडण्यासाठी तपास सुरू केला होता.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com