esakal | Breaking ! अक्‍कलकोट रोडवरील विणकर वसाहत परिसरात आग; जेवायला गेलेले 70 कामगार सुरक्षित; 50 लाखांहून अधिक नुकसान 

बोलून बातमी शोधा

IMG-20210306-WA0268.jpg}

अग्निशामक विभागप्रमुख केदार आवटे म्हणाले... 

 • आगीचे कारण : सुस्पष्ट कारण समजले नाही 
 • आगीतील नुकसान : अंदाजित 50 लाख 
 • मालक : तीन युनिट डब्लिंग, पॉलिमरसह अन्य एक युनिट 
 • किती गाड्या पाणी लागले : बारा ते पंधरा गाड्या 
 • आग आटोक्‍यात येण्यासाठीचा कालावधी : साडेतीन ते साडेचार 
 • आग लागली तेव्हा त्याठिकाणी काय काम सुरु होते : तीन सलग कारखाने असून त्याठिकाणी लाईटचा स्पार्क झाला आणि खाली सूत आल्याने आग आवरता आली नाही. 
solapur
Breaking ! अक्‍कलकोट रोडवरील विणकर वसाहत परिसरात आग; जेवायला गेलेले 70 कामगार सुरक्षित; 50 लाखांहून अधिक नुकसान 
sakal_logo
By
तात्या लांडगे

सोलापूर : दुपारची साडेतीनची वेळ होती, सर्व कामगार जेवणासाठी कारखान्याबाहेर पडले होते. अक्‍कलकोट एमआयडीसी रोडवरील विणकर वसाहत परिसरातील साईराम पॉलिमर कारखान्याजवळ लाईटचा मोठा स्पार्क झाला. त्यावेळी त्याच्या ठिणग्या खाली पडल्या आणि सूताने पेट घेतला. 60 ते 70 कामगार असतानाही त्यांना आग आवरता आली नाही. त्याचवेळी एकाने अग्निशामक विभागाला कॉल केला आणि लागलीच त्याठिकाणी अग्निशामकच्या चार गाड्या पोहचल्या. एक तासानंतर आग आटोक्‍यात आली. या आगामी अंदाजित 50 लाखांचे नुकसान झाल्याचा अंदाज अग्निशामक विभागप्रमुख केदार आवटे यांनी 'सकाळ'शी बोलताना सांगितले.

अग्निशामक विभागप्रमुख केदार आवटे म्हणाले... 

 • आगीचे कारण : सुस्पष्ट कारण समजले नाही 
 • आगीतील नुकसान : अंदाजित 50 लाख 
 • मालक : तीन युनिट डब्लिंग, पॉलिमरसह अन्य एक युनिट 
 • किती गाड्या पाणी लागले : बारा ते पंधरा गाड्या 
 • आग आटोक्‍यात येण्यासाठीचा कालावधी : साडेतीन ते साडेचार 
 • आग लागली तेव्हा त्याठिकाणी काय काम सुरु होते : तीन सलग कारखाने असून त्याठिकाणी लाईटचा स्पार्क झाला आणि खाली सूत आल्याने आग आवरता आली नाही. 

आग लागलेल्या कारखान्याअंतर्गत तीन युनिट असून त्या युनिटचे मोठे नुकसान झाले असून साहित्य जळून खाक झाले आहे. अग्निशामक विभागाच्या चार गाड्यांमध्ये खासगी टॅंकरच्या सहायाने पाणी पोहच करण्यात आले. त्यावेळी साडेतीन ते साडेचार या वेळेत आग विझविण्यात अग्निशामक विभागाला यश मिळाले. सध्या केदार आवटे हे त्याठिकाणी उपस्थित कामगारांकडून आगीबद्दल सविस्तर माहिती घेत आहेत.