भावाने दिली बहिणीला जीवे मारण्याची धमकी ! भूसंपादनाच्या 25 लाखांचा प्रश्‍न; पडसाळीतील घटना

तात्या लांडगे
Friday, 2 October 2020

उत्तर सोलापुरातील पडसाळी येथे वडिलोपार्जित जमीन असून त्यात बहिणींचाही अविभक्‍त हिस्सा आहे. मिळकतीच्या वाटण्या झाल्या नसून भोयरे ते पडसाळी कालव्यासाठी जमिनीचे संपादन झाले आहे. त्याबदल्यात 25 लाख रुपयांचा मोबदला मिळाला असून तो मोबदला चौघांनी बनावट नाहरकत प्रमाणपत्र देऊन लंपास केला आहे.  भाऊ सिरसट हे फिर्यादीचे वडील असून उर्वरित तिघांसोबत भाऊ- बहिणीचे नाते असून त्यांनी जीवे ठार मारण्याची धमकी दिल्याचेही फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. 

सोलापूर : उत्तर सोलापुरातील पडसाळी येथे वडिलोपार्जित जमीन असून त्यात बहिणींचाही अविभक्‍त हिस्सा आहे. मिळकतीच्या वाटण्या झाल्या नसून भोयरे ते पडसाळी कालव्यासाठी जमिनीचे संपादन झाले आहे. त्याबदल्यात 25 लाख रुपयांचा मोबदला मिळाला असून तो मोबदला चौघांनी बनावट नाहरकत प्रमाणपत्र देऊन लंपास केला आहे. भाऊ सिरसट हे फिर्यादीचे वडील असून उर्वरित तिघांसोबत भाऊ- बहिणीचे नाते असून त्यांनी जीवे ठार मारण्याची धमकी दिल्याचेही फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. 

 

या प्रकरणी उज्वला रमेश गाटे (रा. देवकुळी, ता. तुळजापूर) यांनी सदर बझार पोलिसांत फिर्याद दिली आहे. या प्रकरणी भाऊ दत्तू सिरसट, अतुल भाऊ सिरसट (दोघे रा. पडसाळी), वंदना नागनाथ जाधव (रा. देवकुळी, ता. तुळजापूर) आणि रेखा दत्तात्रय पवार (रा. वांगी, ता. उत्तर सोलापूर) यांच्याविरुध्द गुन्हा दाखल झाला आहे.

 
गॅस टाकी, होम थिएटर चोरले 
सोलापूर : शहरातील सेटलमेंट फ्रि कॉलनी क्र. एक (पारधी कॅम्प) येथील श्रीधर बन्सीलाल चव्हाण यांच्या घरातून चोरट्याने गॅस सिलेंडर टाकी, स्टीलची पाण्याची टाकी, होम थिएटर चोरुन नेले आहे. ही घटना गुरुवारी (ता. 1) पहाटेच्या सुमारास घडल्याची फिर्याद चव्हाण यांनी सलगर वस्ती पोलिसांत दिली आहे. चव्हाण हे ज्या खोलीत झोपले होते, त्या खोलीचा दरवाजा बंद होता. शेजारील लोकांनी त्यांना हाक मारुन दरवाजा उघडण्यास सांगितले. त्यानंतर बाहेर येऊन पाहिले असता घरातील वस्तूंची चोरी झाल्याचे समजले, असेही फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. 

 
मागील रागातून मुलास मारहाण 
सोलापूर : मागील भांडणाचा राग मनात धरुन जनाबाई मस्के, विद्या मस्के, शुभांगी मस्के, नागिण मस्के (रा. भवानी पेठ), उमेश जाधव (रा. उमेश जाधव) यांनी माझ्या मुलाला शिवीगाळ केली. त्यानंतर दमदाटी करुन लाथाबुक्‍क्‍यांनी मारहाण केल्याची फिर्याद सिताबाई संजय सितासावंत यांनी जोडभावी पोलिसांत दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी पाचजणांविरुध्द गुन्हा दाखल केला असून पुढील तपास पोलिस नाईक श्री. शेख करीत आहेत. 

भांडणाचा जाब विचारणाऱ्याला मारहाण 
सोलापूर : आईला व बहिणीला विनाकारण शिवीगाळ का करता म्हणून योगीराज दत्ता मस्के हे विचारायला गेले. त्यावेळी सिताबाई सितासावंत, दादुशा सितासावंत, सचिन सितासावंत (रा. भवानी पेठ) यांनी मलाही शिवीगाळ केली. त्यानंतर आईला व मला हाताने व लाथाबुक्‍यांनी मारहाण केली. तत्पूर्वी, भाजी कापण्याच्या चाकूने कपाळाच्या डाव्या बाजूस मारहाण करुन जखमी केल्याचेही मस्के यांनी पोलिसांना सांगण्यात आले. 

पोलिसांनी वसूल केला 
आठ लाखांचा दंड 

सोलापूर : शहरातील कोरोनाचा संसर्ग वाढू नये म्हणून शहर पोलिसांकडून बेशिस्त वाहनचालकांसह विनामास्क घराबाहेर फिरणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई केली जात आहे. 17 ऑगस्ट ते 2 ऑक्‍टोबर या काळात पोलिसांनी शहरातील बेशिस्त वाहनचालकांकडून सात लाख 87 हजारांहून अधिक रुपयांचा दंड वसूल केला आहे. कोरोनाचा संसर्ग तथा प्रादुर्भाव कमी होण्यासाठी नागरिकांनी स्वत:च्या कुटुंबाची जबाबदारी घ्यावी, विनाकारण घराबाहेर फिरु नये, असे आवाहन पोलिस आयुक्‍त अंकुश शिंदे यांनी केले आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Brother threatens to kill sister Question of 25 lakhs for land acquisition