संचारबंदीत चक्क पोलिसाच्या उपस्थितीत कापला तलवारीने केक 

Cake with sword cut in the presence of police in curfew
Cake with sword cut in the presence of police in curfew
Updated on

करमाळा (जि. सोलापूर) : कोरोनाचा प्रसार थांबवण्यासाठी संचारबंदी लागू असताना पोलिसाच्या उपस्थितीत तलवारीने केक कापून वाढदिवस साजरा करणाऱ्या विकास विठ्ठल ननवरे, पोलिस शिपाई विनायक रामजी काळे यांच्यासह 24 जणांविरोधात करमाळा पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा वाढदिवसाचा कार्यक्रम (ता. 24) रोजी रात्री पावणे दहाच्या सुमारास हिसरे (ता. करमाळा) परिसरात पार पडला. 
हिसरे येथे कार्यरत पोलिस शिपाई विनायक रामजी काळे या कार्यक्रमाला उपस्थित होते. हिसरे गावातील विकास ननवरे यांच्या वाढदिवसानिमित्त बाळासाहेब पवार, विकास ननवरे, बाळासाहेब कोंडलकर, दत्ता टकले, हरी काळे, सतीश ननवरे, अनिल साळुंखे, अंबादास राऊत, हनुमंत पवार, गोरख काळे, योगिराज काळे, बबल्या पवार, नागेश काळे, संतोष काळे, सचिन काळे, नाना काळे, सोमनाथ काळे, किशोर काळे, अंगद काळे, धनाजी काळे, बिभीषण काळे, विनायक काळे, रघुनाथ पवार, अतुल रणदिल (सर्व रा. हिसरे, ता. करमाळा) यांच्या उपस्थितीमध्ये तलवारीने केक कापण्याचा कार्यक्रम पार पडला. या सर्वांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 
याबाबत पोलिस हावलदार केदारनाथ भरमशेट्टी यांनी फिर्याद दिली आहे. सध्या कोरोना रोगाच्या पार्श्वभूमीवर करमाळा तालुक्‍यात कडक बंदोबस्त नेमण्यात आलेला असताना हिसरे गावातील विकास ननवरे यांच्या वाढदिवसानिमित्त (ता. 24) रोजी रात्री पावणे अकराच्या सुमारास हिवरे-हिसरे रस्त्यावरच वाढदिवस साजरा करण्यात आला. सदर प्रकरणात आपत्ती व्यवस्थापन कायद्यानुसार तसेच शस्त्र अधिनियम व साथीचे रोग कायद्याप्रमाणे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. तपास पोलिस उपनिरिक्षक गणेश शिंदे हे करीत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com