कौतुकास्पद! चिनी "कॅम स्कॅनर' बंद झालं म्हणून नाराज होऊ नका, त्याला टक्कर देण्यासाठी आलंय सोलापूरचे "स्कॅन इट इंडिया'! 

Scan it India
Scan it India

भाळवणी (सोलापूर) : भारत देश चिनी वस्तू व मोबाईलमधील काही ऍप्लिकेशनवर बंदी घालत असतानाच, कोर्टी (ता. पंढरपूर) येथील एस. के. एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग महाविद्यालयात अभियांत्रिकीचे शिक्षण पूर्ण केलेला माजी विद्यार्थी श्रीकृष्ण दिवसे याने चीनच्या "कॅम स्कॅनर' ऍप्लिकेशनला टक्कर देण्यासाठी इंडियाचे "स्कॅन इट इंडिया' हे ऍप्लिकेशन मार्केटमध्ये आणले असून, या ऍप्लिकेशनचा फायदा भारतीय नागरिकांना खूप मोठ्या प्रमाणात होणार आहे. 

भारतीय मोबाईल फोन ऍप्लिकेशन मार्केट हे हजारो कोटी रुपयांचे असून, यामध्ये सर्वाधिक ऍप्लिकेशन हे चिनी बनावटीचे आहेत. काही दिवसांपासून चीनचे ऍप्लिकेशन बंद करण्याचा निर्णय केंद्र सरकार घेत आहे. या पार्श्‍वभूमीवर "स्कॅन इट इंडिया' या ऍप्लिकेशनचा फायदा होणार आहे. 

आपल्या ऍप्लिकेशनबद्दल श्रीकृष्ण दिवसे "सकाळ'शी बोलताना म्हणाला, विद्यार्थ्यांना आपल्या नोट्‌ससह इतर गोष्टी स्कॅन करून पीडीएफमध्ये कन्व्हर्ट करता येणार आहेत. याशिवाय पीडीएफ स्कॅन केलेल्या पेजमधला अनावश्‍यक मजकूरसुद्धा काढून टाकता येणार आहे. सर्वसामान्य नागरिकांना "स्कॅन इट इंडिया' या ऍप्लिकेशनच्या माध्यमातून आधार कार्ड, पॅन कार्ड, सातबारा उतारा व अन्य कागदपत्रे स्कॅन करून जतन करू ठेवता येणार आहेत. हे ऍप्लिकेशन अँड्रॉईड मोबाईलच्या प्ले स्टोअरमधून फ्रीमध्ये डाउनलोड करता येते. याशिवाय भविष्यात नोकरीबद्दल माहिती, व्हिडिओ बनविणे, फाइल शेअर करणे या गोष्टी ऍपमध्ये आणण्याचा कंपनीचा मानस आहे. 

या यशाबद्दल श्रीकृष्ण दिवसे याचे सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. कैलाश करांडे, डॉ. चेतन पिसे, डॉ. रवींद्र व्यवहारे, डॉ. अल्ताफ मुलाणी, डॉ. स्वानंद कुलकर्णी, डॉ. श्‍याम कुलकर्णी, डॉ. बाळासाहेब गंधारे, प्रा. नामदेव सावंत, प्रा. श्रीनिवास गंजेवार, प्रा. सुधा सुरवसे, प्रा. समीर कटेकर, प्रा. अनिल निकम आदींनी श्रीकृष्ण दिवसे याचे अभिनंदन केले. 

संपादन : श्रीनिवास दुध्याल

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com