वेळेत खर्च सादर न केलेल्या उमेदवारावर होणार अपात्रतेची कारवाई

Candidates contesting Gram Panchayat elections will be disqualified if they do not submit their expenses on time
Candidates contesting Gram Panchayat elections will be disqualified if they do not submit their expenses on time
Updated on

मोहोळ (सोलापूर) : मोहोळ तालुक्यातील 76 ग्रामपंचायतीच्या पंचवार्षिक निवडणूक लढविलेल्या उमेदवारांनी निकाल घोषित झालेल्या दिवसापासून 30 दिवसाच्या आत निवडणुकीसाठी झालेला खर्च विहित नमुन्यात पावत्या सह निवडणूक विभागात सादर करावा, अन्यथा अपात्रतेच्या कारवाईचे प्रस्ताव जिल्हाधिकारी यांच्याकडे मंजुरीसाठी सादर करण्यात येणार असल्याची माहिती तहसीलदार जीवन बनसोडे यांनी दिली.

मोहोळ तालुक्यातील 76 ग्रामपंचायतीच्या निवडणुकीच्या प्रक्रियेसाठी एकूण दोन हजार 166 उमेदवारांनी सहभाग नोंदविला होता. निवडणुकीचा निकाल घोषित झाल्यापासून 30 दिवसाच्या आत झालेला खर्च पावत्यासह विहीत नमुन्यातील फॉर्म भरून उपकोषागार कार्यालयात सादर करणे गरजेचे आहे. मात्र अद्याप अनेक उमेदवारांनी खर्च सादर केला नाही. त्यामुळे त्यांच्यावर सहा वर्षासाठी अपात्रतेची कारवाई होऊ शकते. सन 2015 च्या निवडणुकीत वेळेत खर्च सादर न केल्याने विविध ग्रामपंचायतीचे 241 उमेदवार अपात्र झाले होते. विजयी झालेले, पराभूत झालेले, बिनविरोध निवडून आलेले, उमेदवारी मागे घेतलेले या सर्वांनी खर्च सादर करणे गरजेचे आहे. आत्तापर्यंत केवळ एक हजार 44 जणांनीच खर्च सादर केला आहे. 17 फेब्रुवारी ही खर्च सादर करण्याची अंतिम तारीख आहे.

शुक्रवार (ता. 5) फेब्रुवारीपर्यंत 176 बिनविरोध निवडून आलेल्या उमेदवारांपैकी 173 जणांनी खर्चाचे विवरण सादर केले आहे. निवडणूक रिंगणातील एक हजार 223 पैकी 641 जणांनी, निवडणुकीतून माघार घेतलेल्या 230 जणांनी खर्च सादर केला आहे. अद्याप एक हजार 122 जणांनी खर्च सादर केला नाही, त्यामुळे त्यांच्या विरोधात अपात्रतेचे प्रस्ताव तयार करणे अनिवार्य असल्याचे बनसोडे यांनी सांगितले.
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com