"येथे' मुदतबाह्य बारा लाख रुपयांची कीटकनाशके विक्रीस! "विक्रेत्यावर गुन्हा दाखल

अभय जोशी 
Thursday, 17 September 2020

शेख यांनी कासेगाव येथील गोदामामध्ये विक्रीस बंदी असलेली काही कीटकनाशके ठेवली होती. कृषी केंद्रातील औषधांचा पंचनामा करण्यात आला. मुदत संपलेली सुमारे दहा ते बारा लाख रुपये किमतीची 88 वेगवेगळ्या कंपन्यांची कीटकनाशके विक्रीस ठेवल्याच्या कारणावरून राजेंद्र पवार यांनी फिरोज शेख यांच्या विरोधात पंढरपूर तालुका पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. पोलिसांनी त्यावरून शेख यांच्या विरोधात गुन्हा नोंद केला आहे. 

पंढरपूर (सोलापूर) : विक्रीसाठी सुमारे दहा ते बारा लाख रुपये किमतीची मुदतबाह्य कीटकनाशके ठेवल्याच्या कारणावरून तालुक्‍यातील कासेगाव येथील कृषी मित्र ऍग्रो एजन्सी या दुकानाचे मालक फिरोज युसूफसाहेब शेख यांच्या विरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. 

या प्रकरणाची पोलिसांकडून समजलेली माहिती अशी, की तालुका कृषी अधिकारी राजेंद्र यल्लप्पा पवार यांनी सोमवारी (ता. 15 ) जिल्हा कृषी अधिकारी रवींद्र माने, जिल्हा गुण नियंत्रण निरीक्षक सागर बारावकर, पंचायत समितीचे कृषी अधिकारी विजय मोरे, तालुका कृषी पर्यवेक्षक शशिकांत महामुनी यांच्यासह तालुक्‍यातील कासेगाव येथील फिरोज शेख यांच्या दुकानाची तपासणी केली. तेव्हा त्यांना कृषी केंद्रात विक्रीसाठी ठेवलेली काही कीटकनाशके मिळाली. विक्रीचा परवाना नसूनही संबंधित कीटकनाशके विक्रीस ठेवल्या प्रकरणी अधिकाऱ्यांनी फिरोज शेख यांच्याकडे चौकशी केली. 

शेख यांनी कासेगाव येथील गोदामामध्ये विक्रीस बंदी असलेली काही कीटकनाशके ठेवली होती. कृषी केंद्रातील औषधांचा पंचनामा करण्यात आला. मुदत संपलेली सुमारे दहा ते बारा लाख रुपये किमतीची 88 वेगवेगळ्या कंपन्यांची कीटकनाशके विक्रीस ठेवल्याच्या कारणावरून राजेंद्र पवार यांनी फिरोज शेख यांच्या विरोधात पंढरपूर तालुका पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. पोलिसांनी त्यावरून शेख यांच्या विरोधात गुन्हा नोंद केला आहे. 

संपादन : श्रीनिवास दुध्याल

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: A case has been registered against one person in Kasegaon for selling expired pesticides