विनामास्क दुचाकीस्वारांची पोलिसाला शिवीगाळ! दोघांवर गुन्हा 

तात्या लांडगे 
Thursday, 19 November 2020

शासकीय कामात अडथळा करून पोलिसाला शिवीगाळ केल्या प्रकरणी अमृत मनोहर थिटे (रा. चौत्रा पूना नाका, हांडे प्लॉट शेजारी) व सोमनाथ निंगप्पा सुसलादी (रा. गुळवंची, ता. उत्तर सोलापूर) यांच्याविरुद्ध सदर बझार पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

सोलापूर : शासकीय कामात अडथळा करून पोलिसाला शिवीगाळ केल्या प्रकरणी अमृत मनोहर थिटे (रा. चौत्रा पूना नाका, हांडे प्लॉट शेजारी) व सोमनाथ निंगप्पा सुसलादी (रा. गुळवंची, ता. उत्तर सोलापूर) यांच्याविरुद्ध सदर बझार पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

शहरातील कोरोनाचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी प्रशासनाकडून नागरिकांना सार्वजनिक ठिकाणी तोंडाला मास्क वापरणे अनिवार्य करण्यात आले आहे. त्यानुसार शहरात पोलिसांकडून विनामास्क वाहनधारकांवर कारवाई सुरू आहे. प्रत्येक पोलिस ठाण्या अंतर्गत ही कारवाई करण्यात येत आहे. 

दरम्यान, पोलिस हवालदार शब्बीर महिबूब तांबोळी (सदर बझार पोलिस ठाणे) हे व सहाय्यक पोलिस निरीक्षक श्री. हरवाळकर यांच्यासह सात रस्ता परिसरात बेशिस्त वाहनचालकांवर कारवाई करीत होते. त्या वेळी शासकीय विश्रामगृहाकडून रेल्वे स्टेशनकडे जाणारी दुचाकी तांबोळी यांनी थांबविली. विनामास्क दुचाकीस्वार अमृत थिटे याने तांबोळी यांना त्या वेळी शिवीगाळ करून अरेरावीची भाषा वापरत दुचाकी घेऊन पळून जाण्याचा प्रयत्न केला. संशयितांनी दुचाकीची धडक देऊन त्यांना खाली पाडले, त्यात त्यांच्या डाव्या हातास जखम झाली आहे. कर्तव्य बजावताना त्या दोघांनी शासकीय कामात अडथळा आणल्याची फिर्याद तांबोळी यांनी पोलिसांत दिली. त्यानुसार पुढील तपास सहायक पोलिस निरीक्षक श्री. चानकोटी हे करीत आहेत. 

संपादन : श्रीनिवास दुध्याल


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: A case has been registered against the two unmasked two wheelers for insulting the police