सोलापुरात फुलली नेदरलॅंडची कॅलालेली 

caloleli.jpg
caloleli.jpg

सोलापूर,: येथील गार्डन लव्हर्स असोसिएशनतर्फे शहरात प्रथमच कॅलालेली या जातीच्या फुलांची लागवड आपल्या त्यांच्या परसबागामध्ये केली आहे. 
सध्या शहरात बागप्रेमी डॉ. राजेंद्र लोणीकर, तृप्ती मुळे, माधुरी आवटे, डॉ. सुजाता बिराजदार यांच्या बागेत आकर्षक अशी कॅलालिली फुले आहेत. मुळात कॅलालिली हे यूरोपीय फुल आहे. जगभरात याची लागवड शेडनेटमध्ये किंवा पॉलिहाऊस मध्ये केली जाते. या फुलांचा प्रमुख उत्पादक देश हा नेदरलॅंड आहे. हे फुल सोलापुरात असावे म्हणून गार्डन लव्हर्स ग्रुपचे संस्थापक राजस शहा यांनी कॅलालिलीचे कंद (ट्युबर्स) नेदरलॅंड येथून मागविले. 
हे फुल सोलापूरातील हवामानात टिकावे त्यासाठी पोर्च, व्हरांडा, बाल्कनी व जेथे फक्त सकाळचे कोवळे ऊन येते अश्‍या जागी कॅलालिली लागवड केली गेली. एक भाग माती, एक भाग शेणखत व एक भाग अन्नपूर्णा खत याप्रमाणे कुंड्या भरल्या व कंद लावले. 
कंद लावणीपासून एकाच महिन्यात कॅलालिलीची अतिशय सुंदर फुले येण्यास सुरुवात झाली.. लाल,पिवळा, काळा, पांढरा, गुलाबी, जांभळा, केशरी अश्‍या अनेक प्रकारच्या फुलांनी सर्व बागप्रेमींच्या बागा फुलून गेल्या. भारतात सर्वप्रथम किचन गार्डनमध्ये हा प्रयोग इतक्‍या मोठया प्रमाणात फक्त सोलापूर येथे यशस्वी झाला आहे. 
हे फुल 15 ते 25 दिवस टिकते. एका कंदाला 15 ते 25 फुले येतात. खूप आकर्षक रंग व मन प्रसन्न करणारे फुल असल्याने कॅलालिली हे बागेत लगेचच लक्ष वेधून घेते.. यासाठी कमी पाणी, कमी सूर्यप्रकाश मानवते. 
ही फुले दिवाणखान्यात, स्वयंपाकघरात, घराच्या मुख्य दरवाजात ठेवता येतात. या फुलांचा बहार 3 महिने असतो. त्यानंतर त्याचे कंद चिलिंग ट्रीटमेंट करून पुढील लागवडीसाठी वापरता येतात.. सोलापूरकरांच्या बागप्रेमामुळे कॅलालिलीची लागवड यशस्वी होऊ शकली. गार्डन लव्हर्सचे राजस शहा,अमोल मोहिते,दीपक आकुडे मनीषा वाले यांनी कॅलालिलीची लागवड सोलापुरात यशस्वी होण्यासाठी अथक परिश्रम घेतले. 


500 कंदाची लागवड
सोलापुरातील जास्त तापमानात हे फुल येईल का ? याची शंका होती. परंतु पूर्ण अभ्यास करून त्याची माहिती गार्डन लव्हर्स ग्रुपला देऊन त्याच्या 500 कंदाची लागवड यशस्वी केली. कॅलालिली हे फुल 18 ते 24 डिग्री तापमानात चांगले येते. हे इनडोअर व सेमी इनडोअर फुलझाड आहे. तसेच सर्वप्रथम किचन गार्डनमध्ये हा प्रयोग इतक्‍या मोठया प्रमाणात फक्त सोलापूर येथे यशस्वी झाला आहे. 
- राजस शहा, संस्थापक, गार्डन लव्हर्स, ग्रुप सोलापूर 

 
असाधारण पुष्प आणि फळझाडे वाढवण्याचा प्रयोग
या प्रकारची फुले सोलापूरच्या उष्ण तापमानात येणार नाहीत अशी समजूत असलेली अनेक असाधारण पुष्प आणि फळझाडे वाढवण्याचा प्रयोग सुरू झाला."कॅला लिली" , नाजुक आणि सुंदर पुष्पे असलेले कंदरोप त्यापैकी एक आहे. आमच्या गृपवर असा आगळावेगळा वैशिष्ट्यपूर्ण आनंद नेहमीच मिळत राहील असा आम्हाला विश्वास आहे. 
- डॉ. राजेंद्र लोणीकर,सभासद, गार्डन लव्हर्स  

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com