बार्शी तालुक्यात सिमेंटचा ट्रक उलटला; दोघे जखमी

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 29 जून 2020

बार्शी तालुक्यातील बावी येथील वळणावर तांडूर (आंध्रप्रदेश) येथून नाशिकला निघालेला सिमेंटचा ट्रक रात्री साडेनऊ वाजता उलटला आहे. यात ट्रकचा ड्रायव्हर चंद्रकांत व इतर एक जण किरकोळ जखमी झाले असून वाहनाचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे.

मळेगाव (सोलापूर) : बार्शी तालुक्यातील बावी येथील वळणावर तांडूर (आंध्रप्रदेश) येथून नाशिकला निघालेला सिमेंटचा ट्रक रात्री साडेनऊ वाजता उलटला आहे. यात ट्रकचा ड्रायव्हर चंद्रकांत व इतर एक जण किरकोळ जखमी झाले असून वाहनाचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे.
आंध्रप्रदेश येथील श्रीनिवास मेटी यांनी नाशिक येथे पाठवलेला सिमेंटचा ट्रक आहे. सिमेंटचा ट्रक रस्त्यावरच पलटी झाल्याने प्रवासी व वाहनधारकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. बार्शी-तुळजापूर राज्यमार्ग खराब रस्त्यामुळे व सततच्या अपघातामुळे या अगोदर नेहमीच चर्चेत राहिला आहे. याच महामार्गावर जामगाव (पा), मळेगाव येथे फरशीचा ट्रक पलटी होऊन मोठं आर्थिक नुकसान झाले होते. तसेच विविध ठिकाणी अपघातात होऊन अनेकांचे मृत्यू देखील झाले आहेत. उपळे, मळेगाव, गौडगाव येथील नागरिकांनी वेळोवेळी आंदोलन करीत व विविध मागण्यांचे निवेदन देत प्रशासनाचे लक्ष वेधले आहे. प्रशासनाने शेलगाव ते बावी पर्यंतच्या मार्गाचे नव्याने डांबरीकरण केले. मात्र पुढे बावी- मळेगाव- जामगाव- उपळे- गौडगाव- तुळजापूर येथील रस्ता डांबरीकरनाच्या प्रतिक्षेत आहे. रस्त्यावर पडलेले खड्डे तात्पुरती मलमपट्टी करून बुजवले जातात. काही दिसतात तेच बुजवलेले खड्डे उखडले जातात. पुन्हा एकदा प्रवासी, वाहनधारकांच्या स्वागतासाठी तयार असतात. त्यामुळे वारंवार घडणारे अपघात टाळण्यासाठी तात्काळ पुढील कामास सुरुवात करावी, अशी भावना नागरिकांमधून व्यक्त होत आहेत.
बावी येथील ग्रामस्थ शंकर आगलावे म्हणाले, बावी येथे बावी- बार्शी- तांदुळवाडी- तुळजापूर असा चौरस्ता आहे. हा भाग नेहमीच रहदारीचा प्रदेश म्हणून ओळखला जातो.त्यामुळे बार्शी-तुळजापूर रोडवर या भागात गतिरोधक बसवले जावेत. गतिरोधक बसविले तर पुढे वळणक्षेत्रावर अपघात होणार नाहीत. त्यामुळे जीवितहानी व वित्तहानी होणार नाही.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Cement truck accident in Barshi taluka Two persons were injured in