वाळूजच्या अखंड हरीनाम सप्ताहाला लाभली शंभर वर्षांची परंपरा 

sant RamBhau Maharaj, Waluj
sant RamBhau Maharaj, Waluj

वाळूज, (ता. मोहोळ जि. सोलापूर) : अखंड हरीनाम सप्ताह अनेक गावात होतो. कुणाचे बारावे वर्ष असेत कुणाचे पंधारवे.. कुणाचे पंचविसावे मात्र सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ तालुक्‍यात असे एक गाव आहे की, शंभराव्या वर्षी सप्ताह सोहळा करत आहे. वाळूज (ता.मोहोळ) गावचे अध्यात्मपीठ "संत श्री रामभाऊ महाराज' यांचा "शतकोत्सव पुण्यतिथी शंभरावा सोहळा सप्ताह' रविवारी 24 जानेवारी रोजी प्रारंभ होत असून, रविवारी 31 जानेवारी रोजी काल्याच्या कीर्तनाने सप्ताहाची सांगता होणार आहे. 

अनेक गावात अखंड हरीनाम सप्ताह होतात, मात्र सलग शंभर वर्षे सप्ताह सोहळ्याची परंपर टिकविणे हे तितकी सोपे नाही. मात्र, हे साध्य केले आहे. मोहोळ तालुक्‍यातील वाळुजच्या ग्रामस्थांनी. 1920 साली कालवश झालेल्या वाळुज येथील सत्पुरुष श्री रामभाऊ महाराज यांना वैराग येथील टेकनाथ महाराज यांचे शिष्यत्त्व लाभले व तमाशाचा नाद सोडून त्यांना लाभलेल्या अविट आवजाचा वापर ईश्‍वर चिंतनासाठी अभंग गायनासाठी केला. त्यांच्या पुण्यतिथीनिमित्त सुरु झालेला हा अखंड ज्ञानयज्ञ आज शंभराव्या वर्षीही सुरू आहे. विशेष म्हणजे या सप्ताह सोहळ्यातील संत रामभाऊ महाराजांच्या पुण्यतिथीच्या दिवशी प्रतिवर्षी उंदरगाव येथील गुरव महाराज यांचे कीर्तन होते. ह.भ.प. शंकरमहराज गुरव यांनी सलग पन्नास वर्षे कीर्तन करण्याची परंपरा संभाळली आहे. सलग शंभर वर्षात एकाही वर्षी खंड न पडू देता. अनेक नामवंत कीर्तनकार, प्रवचनकार, भारुडकार, गायक यांचे पाय वाळूला लागले आहेत. 
सप्ताहाचे दैनंदिन कार्यक्रम पुढील प्रमाणे: 
पहिल्या दिवशी रविवारी(ता.24) वीणापुजन व ग्रंथपुजन होऊन अभिषेक होणार आहे. ग्रंथराज श्री ज्ञानेश्वरी या ग्रंथाचे सकाळी सात ते अकरा या वेळेत सात दिवस पारायण होणार आहे. त्यानंतर गाथा भजन श्री संत रामभाऊ चरित्र वाचन, हरीपाठ, संध्याकाळी सहा ते सात भागवताचार्य ह.भ.प.श्री नंदु महाराज रणशुर(काळेगाव) याचे प्रवचन व रात्री 9 ते 11 या वेळेत ह.भ.प. श्री. शिवाजी झांबरे महाराज (बुलढाणा) यांचे किर्तन होईल. सोमवारी (ता.25) या दिवशी ह.भ.प.श्री परमेश्वर शिंदे (देगांव) यांचे प्रवचन व ह.भ.प.श्री नितीन महाराज जगताप (लातुर) यांचे कीर्तन. मंगळवारी (ता.26) ह.भ.प.भगवान कुलकर्णी यांचे प्रवचन व ह.भ.प.ज्ञानेश्वर फुले यांचे कार्तन, बुधवारी (ता.27) ह.भ.प. विष्णु मिर्धे (आळंदी) यांचे प्रवचन व ह.भ.प. दादा महाराज नरळे (म्हसवड, सातारा) यांचे कीर्तन गुरुवारी (ता.28) ह.भ.प.गुरुराज कुलकर्णी यांचे प्रवचन व युवकमित्र ह.भ.प.गुरुवर्य बंडा तात्या कराडकर महाराज यांचे कीर्तन. शुक्रवारी (ता.29) ह.भ.प. सचिन आनंद महाराज (आळंदी) यांचे प्रवचन व ह.भ.प.कुमार महाराज केमदारणी (लोणी, परंडा) यांचे कीर्तन. शनिवारी (ता.30) ह.भ.प. भगवान महाराज गुरव (उंदरगाव) यांचे प्रवचन व ह.भ.प. माऊली गुरव महाराज (उंदरगाव) यांचे कीर्तन. रविवारी (ता.31) ह.भ.प. विष्णू मिर्धे महाराज (आळंदी) यांचे काल्याचे कीर्तन होऊन ग्रामदिंडी व महाप्रसादाने सप्ताहाची सांगता होणार आहे.सप्ताहात काळात दररोज अन्नदान केले जाणार आहे. भगवान कुलकर्णी लिखित "संत श्री रामभाऊ महाराज चरित्र' या ओवीबद्ध ग्रंथाचे मान्यवरांच्या हस्ते प्रकाशन होणार आहे. 

एका शतकापासून अखंडपणे सुरु असलेला हरीनाम सप्ताह हा मोहोळ तालुक्‍यातील एकमेव असेल. वाळुजकरांच्या भक्तीचा हा सोहळा पारमार्थिक वाटचालीचं प्रतीक आहे.सर्वांना संयोजकांच्या वतीने विनंती आहे, की आपण सर्वांनी या शताब्दी पुण्यतिथीस आवर्जुन उपस्थित राहावे, असे आवाहन भगवान कुलकर्णी व वसंत कादे यांच्यासह सर्व भजनी मंडळाच्या वतीने करण्यात आले आहे. 

संपादन : अरविंद मोटे 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com