मोठी बातमी ! 'चला हवा येऊ द्या'मधील भाऊ कदम, कुशल, निलेशविरुध्द गुन्हा 

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 14 मार्च 2020

  • राजर्षि शाहू महाराज व सयाजीराव गायकवाड यांचा फोटो मार्फ करुन वापरल्याची फिर्याद 
  • संभाजी ब्रिगेडने धार्मिक भावना दुखावल्याचे पोलिसांना सांगितले 
  • सोलापुरातील विजापूर नाका पोलिस ठाण्यात 298 अंतर्गत गुन्हा दाखल 
  • पोलिसांकडून त्या भागाची पडताळणी : कारवाईचे पोलिसांचे आश्‍वासन 

सोलापूर : मराठी वाहिनीवरील 'चला हवा येऊ द्या' या विनोदी कार्यक्रमातील एका भागात राजर्षि शाहू महाराज आणि सयाजीराव गायकवाड यांचा फोटो मार्फ करून अभिनेत्यांच्या रुपात दाखविण्यात आला आहे. त्यामुळे संभाजी ब्रिगेडच्या वतीने शहराध्यक्ष शाम कदम यांनी सोलापुरातील विजापूर नाका पोलीस ठाण्यात धार्मिक भावना दुखावल्याबद्दल फिर्याद दिली. त्यानुसार 298 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

हेही नक्‍की वाचा : बळीराजाची कोंडी ! कर्जमाफीनंतरही तब्बल 39 लाख शेतकरी थकबाकीतच 

चला हवा येऊ द्या या कार्यक्रमात सोमवार व मंगळवारी रात्रीच्या एका भागात राजश्री शाहू महाराज आणि सयाजीराव गायकवाड यांच्या प्रतिमेचा चुकीच्या पद्धतीने वापर करण्यात आला आहे. त्याचा निषेध करीत चला हवा येऊ द्या कार्यक्रमातील कलाकार नीलेश साबळे, कुशल बद्रिके, भाऊ कदम यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी संभाजी ब्रिगेडने पोलिसांकडे केली. त्यानुसार विजापूर नाका पोलीसांनी गुन्हा नोंदविला आहे. या वेळी संभाजी ब्रिगेडचे कार्याध्यक्ष अरविंद शेळके, उपशहरप्रमुख सोमनाथ पात्रे, आशुतोष माने, सीताराम बाबर, सचिव सनी पाटू, संघटक संजय भोसले, अनिल कोकाटे, महेश भंडारे, चेतन चौधरी आदी उपस्थित होते. 

हेही नक्‍की वाचा : बळीराजा हताश ! अवकाळीचे पंचनामेच नाहीत 

...अन्यथा तीव्र आंदोलन 
राजर्षि शाहू महाराज व सयाजीराव गायकवाड यांच्या फोटोचा वापर एका विनोदात्मक मालिकेत चुकीच्या पध्दतीने करण्यात आला आहे. या पार्श्‍वभूमीवर पोलिसांत मालिकेतील कलाकारांवर गुन्हा दाखल झाला आहे. आता संबंधित झी वाहिनीनेही त्याची जबाबदारी घेऊन जाहीर माफी मागावी. अन्यथा तीव्र आंदोलन केले जाईल. 
- श्‍याम कदम, शहराध्यक्ष, संभाजी ब्रिगेड, सोलापूर 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Chala Hava Yeu Dya A crime against bhau Kadam Kushal and Nilesh