चेस द व्हायरस...!!!

 Chase the virus ... !!!
Chase the virus ... !!!

अकलूज (जि. सोलापूर) ः कोरोना विषाणुचा प्रसार रोखण्यासाठी सर्व विभागांसह एकत्रितपणे काम करीत असून "चेस द व्हायरस' ही संकल्पना प्रभावीपणे राबविणार असल्याची माहिती पोलिस अधीक्षक मनोज पाटील यांनी आज दिली.

दरम्यान, लॉकडाऊनच्या काळात ताब्यात घेतलेल्या अकरा हजार वाहनांपैकी साडे नऊहजार वाहने दंड आकारून परत केली असून अकलूजमध्ये एक हजार 546 वाहनांपैकी फक्त 9 वाहने परत देण्याचे राहिले आहे. 

अकलूज पोलीस स्टेशन येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी पोलीस उपविभागीय अधिकारी नीरज राजगुरू, पोलीस निरीक्षक भगवान निंबाळकर उपस्थित होते. नागरिकांनी मास्क, सॅनेटायझरचा वापर करत सुरक्षित अंतर ठेवणे आणि गर्दी न करता व्यवहार करणे अपेक्षित आहे. दुकाने उघडण्याबाबत स्थानिक प्रशासनाने घेतलेल्या निर्णयाची अंमलबजावणी गरजेची आहे. कोरोना बाधित रुग्णाच्या अती संपर्कातील व्यक्तींच्या बरोबरच त्याच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींचाही शोध घेऊन त्यांना विलगीकरण करण्यात येईल. त्यातील ज्या व्यक्तींना कोरोनाची लक्षणे दिसत असतील त्यांची तात्काळ तपासणी केली जाईल. प्रतिबंधित क्षेत्राच्या आजूबाजूला सात किलोमीटरचा परिसर बफर झोन म्हणून जाहीर करण्यात आला आहे. या क्षेत्रातील सर्व शासकीय, खाजगी दवाखाने तसेच औषध दुकाने यांनी उच्च रक्तदाब, मधुमेह, कर्करोग, सर्दी, ताप, खोकला तसेच आयएलआय आणि सारी अशा प्रकारची लक्षणे असणाऱ्यांची माहिती तालुका वैद्यकीय अधिकारी यांना कळवावी. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी जास्तीत जास्त रुग्णांची स्वॅब तपासणी करण्याची गरज आहे. स्थलांतरित व्यक्तींची वर्गवारी करून जिल्ह्याच्या सीमेवर मोबाईल ऍपद्वारे यांची माहिती संपादित केली जात आहे. ज्या व्यक्ती विनापरवाना जिल्ह्यात आल्या आहेत त्यांची माहिती अंगणवाडी व आशा सेविका यांच्याकडून संकलित करण्यात येत आहे. अशा व्यक्तीची वैद्यकीय तपासणी करण्यात येत आहेत. 

माळशिरस तालुका व अकलूजकरांचे विशेष कौतुक 
माळशिरस तालुक्‍यात दोन रुग्ण पॉझिटिव्ह असून एक-दोन दिवसात नंतर त्यांचा रिपोर्ट निगेटिव्ह येईल व तालुका परत शुन्याकडे जाईल अशी आशा व्यक्त करून येथील प्रशासन व नागरिक कौतुकास पात्र आहेत. यापुढेही प्रत्येकाने मास्क. सॅनेटायझर व सोशल डिस्टन्सींगचे पालन करीत प्रशासनाने दिलेले सर्व नियम पाळावेत. 
- मनोज पाटील, पोलिस अधीक्षक, सोलापूर 

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com